JOB Alert : गुड न्यूज! रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी भरती; जाणून घ्या, कसा, कुठे करायचा अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 01:01 PM2021-07-05T13:01:55+5:302021-07-05T13:03:51+5:30

Railway Recruitment 2021: पश्चिम मध्य रेल्वेमध्ये (Western-Central railways) लवकरच मोठी भरती होणार आहे.

JOB Alert railway recruitment 2021 wcr station master recruitment 2021 notification released lbse | JOB Alert : गुड न्यूज! रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी भरती; जाणून घ्या, कसा, कुठे करायचा अर्ज?

JOB Alert : गुड न्यूज! रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी भरती; जाणून घ्या, कसा, कुठे करायचा अर्ज?

Next

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. पश्चिम मध्य रेल्वेमध्ये (Western-Central railways) लवकरच मोठी भरती होणार आहे. स्टेशन मास्टर (Station Master Recruitment) पदासाठी ही भरती होणार असून त्यासाठीचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार स्टेशन मास्टरच्या एकूण 38 जागा रिक्त आहेत. यात 18 जागा या अनारक्षित प्रवर्गासाठी (Open Category) आहेत तर इतर 20 जागा या आरक्षित प्रवर्गासाठी आहेत. या पदभरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

स्टेशन मास्टर (Station Master) - एकूण जागा 38

कोणासाठी किती जागा

GEN - 18

SC  - 5

ST  - 3

OBC  -12

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची आणि शुल्क भरण्याची तारीख - 26 जूनपासून सुरू

अर्ज करण्याची आणि शुल्क शेवटची तारीख - 25 जुलै 2021

वयोमर्यादा

अनारक्षित श्रेणी - 18 ते 40 वर्षे

OBC  - 18 ते 43 वर्षे

SC/ST - 18 ते 45 वर्षे

कुठे करायचा अर्ज 

पश्चिम मध्य रेल्वेची वेबसाईट wcr.indianrailways.gov.in वर जाऊन इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

​​​​

Web Title: JOB Alert railway recruitment 2021 wcr station master recruitment 2021 notification released lbse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.