शिक्षिका म्हणून नोकरी गुजरातमध्ये; मुक्काम अमेरिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 10:20 IST2024-08-10T10:19:36+5:302024-08-10T10:20:13+5:30
स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे शक्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिक्षिका म्हणून नोकरी गुजरातमध्ये; मुक्काम अमेरिकेत
अहमदाबाद : गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजी येथील एका सरकारी शाळेतील धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील एक शिक्षिका राहते अमेरिकेत आणि शाळेत न येता पगार घेते आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे शक्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सरकारने या प्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत. शिक्षिका भावनाबेन पटेल या गेल्या आठ वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्या क्वचितच शाळेत येतात. त्यांच्याकडे अमेरिकेचे ग्रीन कार्ड आहे, तरीही त्यांचे नाव या सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून नोंदवले गेले आहे. याबाबत अनेक निवेदने देऊनही अधिकाऱ्यांकडून सुनावणी होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.