नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणार्यांना कोठडी
By admin | Published: December 8, 2015 01:51 AM2015-12-08T01:51:43+5:302015-12-08T01:51:43+5:30
सोलापूर : निंबर्गीत बोगस संस्था स्थापन करून त्यात नोकरीचे आमिष दाखवून 1 कोटी 20 लाख रुपये घेऊन चंद्रकांत अडव्यप्पा धोत्रे (रा. येळेगाव, ता. दक्षिण सोलापूर) यांची फसवणूक करणार्या सहा जणांना न्यायदंडाधिकारी शेंडगे यांनी 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
Next
स लापूर : निंबर्गीत बोगस संस्था स्थापन करून त्यात नोकरीचे आमिष दाखवून 1 कोटी 20 लाख रुपये घेऊन चंद्रकांत अडव्यप्पा धोत्रे (रा. येळेगाव, ता. दक्षिण सोलापूर) यांची फसवणूक करणार्या सहा जणांना न्यायदंडाधिकारी शेंडगे यांनी 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.अभय रामराव लव्हारे, अजय रामराव लव्हारे, मीनाक्षी नरहरराव कदम, मनोज नरहरराव कदम, रामराव रघुनाथ लव्हारे आणि सुनील कचरु निकाळजे (सर्व जण रा. शिवाजी नगर, बीड) अशी कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. आरोपींनी निंबर्गीत कोमल शिक्षण प्रसारक मंडळ (बीड) संचलित र्शी सिद्धलिंगेश्वर निवासी अपंग विद्यालय काढून चंद्रकांत धोत्रे यांच्याकडून 1 कोटी 20 लाख रुपये घेतले आणि नोकरीत घेतले नाही. मंद्रुप पोलीस ठाण्यात सहा आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता. आरोपींतर्फे अँड. नागेश खिचडे तर सरकारतर्फे अँड. बेसकर हे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)