दिव्यांग तरुणाला 50 लाखांच्या नोकरीची ऑफर! कोडिंग स्पीड पाहून मायक्रोसॉफ्टचे एक्स्पर्टही चकित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 10:03 AM2022-08-31T10:03:03+5:302022-08-31T10:03:42+5:30
Job Offer: शारीरिक कमतरतांना जे लोक यशातील अडथळा समजतात, त्यांच्यासाठी इंदूरच्या यशची ही यशोगाथा खूप काही सांगून जाते. यश सोनकिया या तरुणाला मायक्रोसॉफ्ट कंपनीने ५० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देऊ केले आहे.
इंदूर : शारीरिक कमतरतांना जे लोक यशातील अडथळा समजतात, त्यांच्यासाठी इंदूरच्या यशची ही यशोगाथा खूप काही सांगून जाते. यश सोनकिया या तरुणाला मायक्रोसॉफ्ट कंपनीने ५० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देऊ केले आहे.
यश आठ वर्षांचा असताना त्याला कमी दिसू लागले आणि कुटुंबीय काळजीत पडले. ग्लुकोमामुळे पीडित असलेल्या यशवर कमी वयातच अनेक ऑपरेशन झाले; पण आठ ऑपरेशननंतरही त्याला डोळ्यांनी दिसत नव्हते. आठ वर्षांचा असतानाच त्याच्या डोळ्यासमोर केवळ अंधार होता. यशला सामान्य शाळेऐवजी दृष्टिहीन मुलांच्या शाळेत प्रवेश दिला गेला. त्याने लहानपणीच ठरविले होते की, इंजिनिअर व्हायचे आहे. आपल्या या स्वप्नामागे धावताना त्याने शारीरिक कमतरतेला अडथळा होऊ दिले नाही. अलीकडेच दिलेल्या या मुलाखतीत यशने इतक्या वेगाने कोडिंग केली की, हे पाहून मायक्रोसॉफ्टचे तज्ज्ञही अवाक
झाले.
स्क्रीन रीडरच्या मदतीने काेडिंग
यश हा स्क्रीन रीडर साॅफ्टवेअरच्या मदतीने काेडिंग करताे. शिक्षणादरम्यान त्याने यावर प्रभुत्व मिळविले हाेते. यशच्या वडिलांचे इंदूरमध्ये काेर्टाजवळ चहा-नाश्त्याचे एक लहानसे दुकान आहे. मुलाच्या या यशाने आई-वडील अतिशय आनंदी आहेत.
यशची यशोगाथा
यश एका सामान्य कुटुंबातील आहे. त्याचे वडील इंदूरच्या कोर्टाजवळ चहा, नाश्त्याचे दुकान चालवितात. यशने इंदूरच्या एसजीएसआयटीएसमधून २०२१ मध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली. मायक्रोसॉफ्ट ही त्याची नोकरीची पहिलीच कंपनी आहे. त्याला काेणत्या कंपनीत नाेकरी करायची आहे, याची एक यादीच त्याने केली हाेती.