भारतीय सैन्यात देशसेवेची संधी; इंजिनिअर, वकिलांना पगार 1.77 ते 2.18 लाख
By हेमंत बावकर | Published: October 14, 2020 11:29 AM2020-10-14T11:29:06+5:302020-10-14T11:30:39+5:30
Indian Army Recruitment: अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2020 असून कोणत्याही उमेदवाराला अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजेच ही प्रक्रिया निशुल्क आहे.
Indian Army SSC Technical Course Vacancy 2020: इंजिनिअरिंगच्य़ा कोणत्याही शाखेतून पदवी मिळविणाऱ्यांसाठी (BE / BTech) भारतीय़ सैन्यात सेवा देण्याची संधी चालून आली आहे. इंजिनिअर पदवीधारकांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) टेक्निकल कोर्स अंतर्गत जागा निघाल्या आहेत. यामध्ये पुरुष आणि महिला या दोन्हींसाठी भरती होणार आहे.
पदांचे नाव
शॉर्ट सर्विस कमीशन (टेक्निकल) 56 पुरुषांसाठी
शॉर्ट सर्विस कमीशन (टेक्निकल) 27 महिलांसाठी
पदांची संख्या लवकरच घोषित केली जाणार आहे.
पगार - 56000 रुपये ते 177500 रुपये एवढे पेस्केल देण्यात येणार आहे. (लेव्हल - 10 नुसार)
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ज्वाईन इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर joinindianarmy.nic.in जाऊन अर्ज करावा लागणार आहे. अर्जाची लिंक आजपासून सुरु केली जाणार आहे. तेव्हाच या भरतीची सारी माहिती दिली जाणार आहे. अद्याप या वेबसाईटवर याची माहिती अपलोड झालेली नाही. य़ामुळे इच्छुकांना थोड्या वेळाने वेबसाईट पहावी लागणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2020 असून कोणत्याही उमेदवाराला अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजेच ही प्रक्रिया निशुल्क आहे.
दरम्यान, 13 ऑक्टोबरला कायद्याची पदवी एलएलबी कमीतकमी 55 टक्क्यांनी उत्तीर्ण झालेल्यांसाठी जागा काढण्यात आलेल्या आहेत. यामध्ये ५ पुरुष आणि 3 महिलांसाठी ही भरती आहे. वयाची अट 21 ते 27 वर्षे आहे. 14 वर्षे सेवा करावी लागणार आहे. यासाठी पेस्केल 56100 ते 218200 रुपये एवढे पदांनुसार आहे.