देशात आयटी क्षेत्रात नाेकऱ्या हाेतील निर्माण; ‘नॅसकाॅम’ने बँक ऑफ अमेरिकेचा दावा फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 09:15 AM2021-06-19T09:15:15+5:302021-06-19T09:15:26+5:30

चालू आर्थिक वर्षातही भारतीय आयटी कंपन्या ९६ हजार कर्मचाऱ्यांना नाेकरी देणार आहेत.

job will create IT sector in the country; Nasscom rejects Bank of America claim | देशात आयटी क्षेत्रात नाेकऱ्या हाेतील निर्माण; ‘नॅसकाॅम’ने बँक ऑफ अमेरिकेचा दावा फेटाळला

देशात आयटी क्षेत्रात नाेकऱ्या हाेतील निर्माण; ‘नॅसकाॅम’ने बँक ऑफ अमेरिकेचा दावा फेटाळला

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील आघाडीच्या साॅफ्टवेअर कंपन्या २०२२ पर्यंत ३० लाख कर्मचाऱ्यांना कमी करणार असल्याचा बँक ऑफ अमेरिकेने अहवाल दिला हाेता. ताे ‘नॅशनल असाेसिएशन ऑफ साॅफ्टवेअर ॲण्ड सर्व्हिस कंपनीज’ने (नॅसकाॅम) फेटाळला आहे. 

‘नॅसकाॅम’ने एका निवेदनात म्हटले आहे, की याउलट या कंपन्यांनी माेठ्या प्रमाणावर नाेकरभरती केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात १ लाख ३८ हजार कर्मचाऱ्यांना सामावून घेतले. तसेच चालू आर्थिक वर्षातही भारतीय आयटी कंपन्या ९६ हजार कर्मचाऱ्यांना नाेकरी देणार आहेत. बँक ऑफ अमेरिकेच्या अहवालात ऑटाेमेशनमुळे नाेकरकपात हाेण्याचा अंदाज वर्तविण्यात आला हाेता. याउलट ‘नॅसकाॅम’ने म्हटले आहे, की ऑटाेमेशनद्वारे आयटी क्षेत्रातील कामाचे स्वरूप बदलून अडीच लाखांहून अधिक नाेकरभरती हाेईल. नुकतेच कंपन्यांनी डिजिटल क्षेत्रात प्रशिक्षित असलेल्या ४० हजार फ्रेशर्सना नाेकऱ्या दिल्याचे ‘नॅसकाॅम’ने म्हटले आहे. नेसकॉमच्या दाव्यामुळे देशातील आयटी क्षेत्रात चैतन्याचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

अहवालातील मुद्दे चुकीचे
n बँक आफ अमेरिकेच्या अहवालात नाेकरकपातीबाबत काही मुद्दे चुकीचे असल्याचे ‘नॅसकाॅम’ने म्हटले आहे. ऑटाेमेशन आणि ‘आरपीए’ क्षेत्र गेल्या काही वर्षांपासून विकसित हाेत आहे. त्यामध्ये सुमारे २००  अब्ज डाॅलर्स 
एवढी क्षमता असून, आणखी नाेकऱ्यांसाठी भरपूर वाव असल्याचे ‘नॅसकाॅम’ने स्पष्ट केले आहे. 

काय हाेता दावा? 
n इन्फाेसिस, टीसीएस, काॅग्नीझंट, विप्राे, टेक महिंद्र यासारख्या आघाडीच्या साॅफ्टवेअर कंपन्या ऑटाेमेशन प्रक्रियेमुळे २०२२ पर्यंत ३० लाख नाेकरकपात करतील, असा दावा बँक ऑफ अमेरिकेने एका अहवालातून केला हाेता. त्याद्वारे सुमारे १०० अब्ज डाॅलर्स एवढी बचतही या कंपन्या करतील, असाही दावा करण्यात आला हाेता.
 

Web Title: job will create IT sector in the country; Nasscom rejects Bank of America claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.