IOCL Recruitment: IOCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 1 लाखापेक्षा जास्त पगार; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 04:09 PM2021-01-31T16:09:58+5:302021-01-31T16:21:11+5:30

Indian Oil Corporation job recruitment 2021: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने ज्युनिअर इंजिनिअर असिस्टंट पदाच्या भरतीसाठी नोटीफिकेशन जारी केलं आहे.

jobs indian oil corporation limited releases notification for 16 vacancies on post of junior assistant engineer | IOCL Recruitment: IOCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 1 लाखापेक्षा जास्त पगार; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या...

IOCL Recruitment: IOCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 1 लाखापेक्षा जास्त पगार; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या...

Next

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (Indian Oil Corporation Ltd.) ज्युनिअर इंजिनिअर असिस्टंट पदाच्या भरतीसाठी नोटीफिकेशन जारी केलं आहे. आयओसीएलच्या (IOCL) अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. एकूण 16 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 28 जानेवारीपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अधिकृत वेबसाईटवर iocrefrecruit.in ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. 19 फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

महत्वाच्या तारखा

अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू व्हायची तारीख - 28 जानेवारी 2021

अर्ज करण्याची अंतिम तारीख - 19 फेब्रुवारी 2021

लेखी परीक्षेची अपेक्षित तारीख - 28 फेब्रुवारी 2021

निकाल जाहीर होण्याची तारीख - 9 मार्च 2021

शैक्षणिक पात्रता 

उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून केमिकल/ रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा किंवा बीएससीची (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि औद्योगिक रसायनशास्त्र या विषयात) पदवी असणे आवश्यक आहे. जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांसाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक आहेत. तर अनुसुचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांसाठी 45 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा 

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे तर जास्तीत जास्त वय 26 वर्षे यामध्येच असावे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त वयात 3 वर्षे, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयात 5 वर्षांची सवलत देण्यात आली आहे. त्यासोबतच प्रत्येक प्रवर्गातील उमेदवारांना त्यांच्या अनुभवाच्या बरोबरीने जास्तीत जास्त वयात सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया 

लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. प्रवर्गनिहाय आणि पदनिहाय गुणवत्ता यादी तयार केली जाईल, जी लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर असेल.

एकूण पगार

आयओसीएलच्या ज्युनिअर इंजिनिअर असिस्टंट पदांच्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला महिन्याला 25,000 ते 1,05,000 रुपये पगार मिळणार आहे.

असा करा अर्ज

- उमेदवाराला सर्वप्रथम iocrefrecruit.in च्य़ा अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.

- होमपेजवर दिलेल्या 'Recruitment' लिंकवर क्लिक करा.

- क्लिक केल्यानंतर पुढील टॅबवर पुनर्निर्देशित 'Redirect' केले जाईल.

- याठिकाणी 'Apply now' या बटणावर क्लिक करा.

- 'Apply now' वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सूचना व्यवस्थित वाचाव्या लागतील. त्यानंतर संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरुन 'Next' बटणावर क्लिक करा.

- सर्वात शेवटी अर्ज व्यवस्थित तपासून 'Submit' करा.

एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

अरे व्वा! फक्त चॉकलेट खा आणि घरबसल्या लाखो रुपये कमवा; "या" कंपनीने दिली हटके जॉबची ऑफर

कँडी फनहाऊस (Candy Funhouse) या टॉफी कंपनीने हा हटके जॉब ऑफर केला आहे. ही कंपनी कॅनडातील ओंटारिओच्या सिनिसाऊगा शहरामध्ये आहे. या जॉबची खासियत म्हणजे जगात तुम्ही कुठेही असाल तरी या कंपनीसाठी काम करू शकता. या कंपनीला त्यांनी बनवलेली टॉफी खाण्यासाठी फुल टाइम आणि पार्ट टाइम कर्मचारी हवे आहेत. जे कंपनीने तयार केलेली टॉफीज खाऊन त्याच्या चवीची माहिती हे जगाला देऊ शकतील. कंपनीने यासाठी खास जाहिरात दिली आहे. या जाहिरातीनुसार कंपनीला कँडिओलॉजिस्ट (Candyologist) पदासाठी लोक हवे आहेत. टॉफी कंपनीने तयार केलेल्या टॉफीची चव चाखणं हे या कँडिओलॉजिस्ट काम असेल. कंपनीने आपल्या जाहिरीतीत दिलेल्या माहितीनुसार, कँडिओलॉजिस्टचं काम करणाऱ्याला व्यक्तीला कंपनी एका तासासाठी 47 डॉलर देणार आहे.

​​​​

 

Web Title: jobs indian oil corporation limited releases notification for 16 vacancies on post of junior assistant engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.