बापरे! ओमायक्रॉनचं स्टेटस ठेवणं तरुणाला पडलं चांगलंच महागात; थेट जावं लागलं तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 10:26 PM2021-12-05T22:26:12+5:302021-12-05T22:34:44+5:30

Whatsapp status on omicron : व्हॉट्सअ‍ॅपवर ओमायक्रॉनचं स्टेटस ठेवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. थेट तुरुंगातच रवानगी झाली आहे. 

jodhpur aiims office boy sunil reached behind bars for putting whatsapp status on omicron variant of corona | बापरे! ओमायक्रॉनचं स्टेटस ठेवणं तरुणाला पडलं चांगलंच महागात; थेट जावं लागलं तुरुंगात

बापरे! ओमायक्रॉनचं स्टेटस ठेवणं तरुणाला पडलं चांगलंच महागात; थेट जावं लागलं तुरुंगात

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान ओमायक्रॉनने चिंता वाढवली आहे. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर अनेक मेसेज हे व्हायरल होत असतात. काही अफवा पसरवल्या जात असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर ओमायक्रॉनचं स्टेटस ठेवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. थेट तुरुंगातच रवानगी झाली आहे. 

जोधपूर एम्समधील ऑफिस बॉयने आपल्या फोनमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवलं होतं. ओमायक्रॉन व्हेरिएंटचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवल्याप्रकरणी या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. जोधपूर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बासनी पोलिसांनी त्याच्या विरोधात संक्रमण कायदा अद्यादेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव सुनील असं असून तो जोधूपर एम्स रुग्णालयात ऑफिस बॉय म्हणून काम करतो. 

प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्येही खळबळ

सुनील एम्स रुग्णालयात कार्यरत आहे. त्यामुळे त्याने ठेवलेलं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस अनेकांनी व्हायरल करण्यास सुरुवात केली. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्येही खळबळ उडाली. तसेच प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या कोरोना कंट्रोल रूममधील फोन वाजू लागले. नागरिकांकडून या संदर्भात विचारणा होऊ लागली. डेप्युटी सीएमएचओ प्रीतम सिंह यांनी सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या एका पोस्टची माहिती पोलीस आयुक्तांना पाठवली. 

ओमायक्रॉन संदर्भात काही जण अफवा पसरवत असल्याची माहिती दिली. पोलीस आयुक्त जोस मोहन यांच्या निर्देशानुसार बसनी पोलिसांनी ऑफिस बॉय सुनीलला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. एकूण पाच जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी कर्नाटकमधील दोघांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे. तर गुजरात, महाराष्ट्र आणि दिल्लीतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: jodhpur aiims office boy sunil reached behind bars for putting whatsapp status on omicron variant of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.