Congo Fever : राजस्थानमध्ये खतरनाक आजाराची एन्ट्री; कांगो तापाने महिलेचा मृत्यू, सरकारने जारी केला अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 10:06 AM2024-10-10T10:06:19+5:302024-10-10T10:22:48+5:30

Congo Fever : ५१ वर्षीय महिलेचा कांगो तापामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

jodhpur woman dies of Congo Fever rajasthan govt issues guidelines for state | Congo Fever : राजस्थानमध्ये खतरनाक आजाराची एन्ट्री; कांगो तापाने महिलेचा मृत्यू, सरकारने जारी केला अलर्ट

Congo Fever : राजस्थानमध्ये खतरनाक आजाराची एन्ट्री; कांगो तापाने महिलेचा मृत्यू, सरकारने जारी केला अलर्ट

राजस्थानमधील ५१ वर्षीय महिलेचा कांगो तापामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही बाब समोर आल्यानंतर राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कांगो ताप हा एक घातक आजार आहे. जो प्राण्यांमधून माणसांत पसरतो. प्रशासनाने बाधित भागात तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत जेणेकरून हा आजार पसरण्यापासून रोखता येईल. 

मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूर येथे राहणाऱ्या ५१ वर्षीय महिलेवर अहमदाबादच्या एनएल म्युनिसिपल मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते. ही महिला कांगो तापाने त्रस्त होती. पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या तपासणीत या प्रकरणाची पुष्टी झाली. बुधवारी उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. 

राज्य सरकारने सर्व सरकारी व खासगी वैद्यकीय संस्थांना कोणत्याही रुग्णामध्ये कांगो तापाची लक्षणं आढळून आल्यास तातडीने त्याचे नमुने घेऊन त्यांना तपासणीसाठी पाठवा. तसेच संबंधित वैद्यकीय विभागाला कळवा, अशा सूचना दिल्या आहेत. 

काय आहे कांगो ताप, तो कसा पसरतो?

कांगो तापाचं पूर्ण नाव Rhymian Congo hemorrhagic fever (CCFF) असं आहे. माणसांसाठी अत्यंत घातक असलेला हा आजार प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरला आहे. कांगो ताप हा ज्युनोटीक व्हायरसपासून पसरणारा आजार आहे, जो मुख्यत: छोटे किडे चावल्यानंतर होतो. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाला आवश्यक ती पावलं उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत कारण प्राण्यांपासून हा रोग पसरू नये. 
 

Web Title: jodhpur woman dies of Congo Fever rajasthan govt issues guidelines for state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.