दिल्लीच्या रस्त्यावर जाे बायडेन यांची 'द बीस्ट'; जगातील सर्वांत मजबूत, भक्कम, बुलेटप्रूफ कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 11:29 AM2023-09-09T11:29:44+5:302023-09-09T11:30:00+5:30
भारतात दाखल झाल्यानंतर बायडेन हे ‘द बीस्ट’ या खास वाहनातून पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या भेटीसाठी रवाना झाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांचे जी-२० संमेलनासाठी भारतात आगमन झाले. जगातील सर्वांत शक्तिशाली राष्ट्र असलेल्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांची सुरक्षाही तेवढीच मजबूत आहे. त्यांच्यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात असून, अमेरिकेची सीक्रेट सर्व्हिस टीमदेखील ३ दिवस आधीच भारतात आली आहे. भारतात दाखल झाल्यानंतर बायडेन हे ‘द बीस्ट’ या खास वाहनातून पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या भेटीसाठी रवाना झाले.
अशी आहे ‘द बीस्ट’
- जगातील सर्वांत मजबूत, भक्कम, बुलेटप्रूफ कार.
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जगात कुठेही गेले, तरी ‘द बीस्ट’ त्यांच्यासाेबत असतेच.
- स्माेक स्क्रीन, पंप ॲक्शन शाॅटगन, राॅकेट, अश्रुधुराच्या नळकांड्या, इत्यादी शस्त्रास्त्रे
- बाॅम्बराेधक. गाडीला ८ इंच जाडीचा धातू. ॲल्युमिनियम, टायटेनियम, स्टील आणि सिरॅमिक इत्यादींचा त्यात वापर.
- काचा ५ इंच जाड. ४४ मॅग्नम गाेळ्यांना राेखू शकतात.
- रासायनिक हल्ल्यापासून संरक्षण देण्यास विशेष यंत्रणा.
- टायर फुटले तरीही अनेक मैलांचा प्रवास करता येईल.
१३ काेटी रुपये एवढी गाडीची किंमत आहे.
३०० कमांडाे
बायडेन यांच्या भाेवती तैनात आहेत. दिल्लीच्या रस्त्यावरून निघणारा सर्वांत माेठा ताफा त्यांचाच.
६० वाहने ताफ्यात
बाेइंग सी-१७ ग्लाेबमास्टर ३ या अजस्त्र विमानातून बायडेन यांची ‘द बीस्ट’ ही गाडी भारतात दाखल झाली. ‘यूएस प्रेसिडेन्शियल कॅडिलॅक’ असे या गाडीचे अधिकृत नाव आहे.