Corona Vaccine: गुड न्यूज! जुलैमध्ये मिळू शकेल सिंगल डोस जॉन्सन अँड जॉन्सनची लस; ‘इतकी’ असेल किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 05:31 PM2021-06-26T17:31:38+5:302021-06-26T17:32:54+5:30

Corona Vaccine: भारताला कोरोनाची आणखी एक लस मिळण्याची शक्यता आहे.

johnson and johnson corona vaccine likely to be available in India in july | Corona Vaccine: गुड न्यूज! जुलैमध्ये मिळू शकेल सिंगल डोस जॉन्सन अँड जॉन्सनची लस; ‘इतकी’ असेल किंमत

Corona Vaccine: गुड न्यूज! जुलैमध्ये मिळू शकेल सिंगल डोस जॉन्सन अँड जॉन्सनची लस; ‘इतकी’ असेल किंमत

googlenewsNext

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाला मोठा तडाखा दिल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरली असली, तरी तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटमुळे चिंतेत भर पडली आहे. या एकूणच पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. यातच आता भारताला कोरोनाची आणखी एक लस मिळण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये Johnson & Johnson च्या कोरोना लसीला भारतात परवानगी मिळण्याची शक्यता आहे. (johnson and johnson corona vaccine likely to be available in India in july)

संपूर्ण देशभरात २१ जूनपासून सर्वांसाठी करोना लसीकरण सुरू झाले आहे. देशात आताच्या घडीला सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक व्ही या लसी उपलब्ध आहेत. तसेच फायझर लसीबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच फायझरची कोरोना लसही भारतात उपलब्ध होईल, असे सांगितले जात आहे. मात्र, यापूर्वी Johnson & Johnson ची लस भारताला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मस्तच! ‘ही’ लस ठरेल लहान मुलांसाठी संजीवनी?; सप्टेंबरमध्ये मिळू शकते मान्यता

खासगी क्षेत्रातून खरेदी केली जाणार 

Johnson & Johnson कोरोना लस खासगी क्षेत्रातून देशात खरेदी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात ही लस उपलब्ध असेल, असे सांगितले जात आहे. सरकारने  Johnson & Johnson च्या खरेदीबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. हेल्थकेअर प्रोव्हाइडर्स असोसिएशनने म्हटले आहे की, Johnson & Johnson ची लस थेट कंपनीकडून खरेदी केली जाणार आहे. ही लस जुलैपर्यंत देशात उपलब्ध होऊ शकेल. तसेच सुरुवातीला या लसीचे केवळ १ हजार डोस उपलब्ध असतील. विशेष म्हणजे Johnson & Johnson ची कोरोना लसीचा केवळ सिंगल डोस घ्यावा लागणार असून, ही लस सुमारे १ हजार ८५० रुपयापर्यंत उपलब्ध होऊ शकेल. 

दरम्यान, अमेरिकन कंपनी फायझरच्या लसीला लवकरच भारतात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. फायझर कंपनीचे सीईओ अल्बर्ट बोरला यांनी यासंदर्भात माहिती दिली. फायझर लसीला भारतात मंजुरी मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कंपनी लवकरच सरकारशी अंतिम करार करेल, अशी अपेक्षा आहे, असे बोरला यांनी म्हटले आहे.  
 

Web Title: johnson and johnson corona vaccine likely to be available in India in july

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.