Corona Vaccination: जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला आपत्कालीन वापराची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 05:46 AM2021-08-08T05:46:49+5:302021-08-08T05:47:28+5:30
केंद्र सरकारने आपत्कालीन परवानगी दिलेल्या लसींची संख्या आता पाच झाली आहे. त्यात कोवॅक्सिन, कोविशिल्ड, स्पुटनिक व्ही, मॉडेर्ना यांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : अमेरिकी कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने बनविलेल्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली.
या कंपनीने परवानगीसाठी ५ ऑगस्टला औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला होता. केंद्र सरकारने आपत्कालीन परवानगी दिलेल्या लसींची संख्या आता पाच झाली आहे. त्यात कोवॅक्सिन, कोविशिल्ड, स्पुटनिक व्ही, मॉडेर्ना यांचा समावेश आहे. १८ वर्षे व त्यावरील वयोगटांच्या नागरिकांना ही लस देण्यात येईल. जॉन्सन अँड जॉन्सनची प्रतिबंधक लस कोरोनावर ८५.४ टक्के, तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांसाठी ही लस ९३.१ टक्के प्रभावी ठरल्याचा दावा या कंपनीने केला आहे. तिचा एकच डोस पुरेसा आहे. त्यामुळे लसीकरणावरील खर्च कमी होऊ शकतो. सध्या दोन डोसच्या लसी भारतामध्ये वापरात आहेत. डेल्टा विषाणूमुळे कोरोना रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे.