गुजरातमधील निवडणुकीत व्हीव्हीपीटी जोडा, काँग्रेसच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 04:10 AM2017-09-23T04:10:01+5:302017-09-23T04:10:02+5:30
Next
नवी दिल्ली : मतदान यंत्रात गडबड करून गुजरात निवडणूक जिंकण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्यामुळे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन निवडणुकीत ईव्हीएमसोबत व्हीव्हीपीटी यंत्रही लावण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसने निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या आदेशाचीही आठवण करून दिली आहे. भविष्यातील कोणतीही निवडणूक व्हीव्हीपीटीशिवाय घेऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या वेळी निवडणूक आयोगाने पुढच्या सर्व निवडणुकींत ईव्हीएमसोबत व्हीव्हीपीटीचा वापर करण्याची ग्वाही दिली होती.