साडेतीन लाखांची बनावट दारू जप्त पोलिसांची संयुक्त कारवाई : २८३ लीटर गावठी दारू आढळली

By Admin | Published: October 22, 2016 12:53 AM2016-10-22T00:53:29+5:302016-10-22T00:53:29+5:30

जळगाव : जिल्हाभरात ठिकठिकाणच्या बनावट दारूच्या अड्ड्यावर शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने छापा टाकला. या कारवाईत पथकाने २८३ लीटर गावठी तर १० लीटर देशी दारू, असा एकूण तीन लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त केल असून तीन महिलांसह एकाला ताब्यात घेतले आहे.

Joint action taken by police for seizure of three and a half lakhs of liquor: 283 liters of villain liquor found | साडेतीन लाखांची बनावट दारू जप्त पोलिसांची संयुक्त कारवाई : २८३ लीटर गावठी दारू आढळली

साडेतीन लाखांची बनावट दारू जप्त पोलिसांची संयुक्त कारवाई : २८३ लीटर गावठी दारू आढळली

googlenewsNext
गाव : जिल्हाभरात ठिकठिकाणच्या बनावट दारूच्या अड्ड्यावर शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने छापा टाकला. या कारवाईत पथकाने २८३ लीटर गावठी तर १० लीटर देशी दारू, असा एकूण तीन लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त केल असून तीन महिलांसह एकाला ताब्यात घेतले आहे.
शुक्रवारी सकाळपासून ठिकठिकाणी कर्मचारी, अधिकारी यांच्या पथकाने मोहीम राबविली. कंजरवाडा (जळगाव), सुजदे भोलाणे ता.जळगाव, खेडी कढोली ता.एरंडोल, साळवा ता.धरणगाव, साकेगाव ता.भुसावळ, शिवपूर कन्हाळा ता.भुसावळ, न्हावी ता.यावल, अंजाळे ता.यावल येथील बनावट दारू अड्ड्यांवर पथकाने छापा टाकला. कारवाईत पथकाने अड्डे उद्ध्वस्त केले. तसेच १३ हजार १९० लीटर कच्चे रसायन नष्ट केले. याप्रकरणी १३ बेवारस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तीन महिलांसह एक ताब्यात
राजी राजू सोनवणे रा.कंजरवाडा, कोमल अनिल बाटुंगे रा.कंजरवाडा, पिरू गंगा गवळी रा.शिरपूर कन्हाळा, नथ्थू केशरराज तडवी रा.न्हावी या चार जणांना पथकाने ताब्यात घेतले व समज देऊन चौघांना सोडून देण्यात आले.

भुसावळ विभागात सहा गुन्हे
भुसावळ विभागात केलेल्या कारवाईत पथकाने ५९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच एक हजार लीटर रसायन, १८ लीटर गावठी दारू तर दुसर्‍या कारवाईत ९०० लीटर रसायन व दहा लीटर गावठी दारू जप्त केली. यावल येथे ६०० लीटर रसायन, दहा लीटर गावठी दारू व ९.७२ लीटर देशी दारू जप्त केली आहे. सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोनजणांना ताब्यात घेण्यात आले.

राज्य उत्पादन विभागाचे अधीक्षक एस.एल.आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल, निरीक्षक सी.पी.निकम, दुय्यम निरिक्षक जी.व्ही.इंगळे, एम.पी. पवार, एम.बी.सोनार या अधिकार्‍यांसह वाय.आर. जोशी, सहायक फौजदार डिगंबर पाटील, नारायण सोनवणे, अन्नपूर्णा बनसोडे, एच.एल.ब्राšाणे, पी.पी. वाघ, विजय परदेशी, नीलेश मोरे, संतोष निकम, भूषण वाणी, मधुकर वाघ, मुकेश पाटील, नंदू पवार, जी.सी.कंखरे, परदेशी यांचा पथकात समावेश होता.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक काळात तसेच सण उत्सवांमध्ये कारवाईत सातत्य राहणार आहे, असे राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक सी.पी.निकम म्हणाले.

Web Title: Joint action taken by police for seizure of three and a half lakhs of liquor: 283 liters of villain liquor found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.