सरदारांवरील जोक्स बंद व्हावेत, पण थांबवणार कसे? - सर्वोच्च न्यायालय
By admin | Published: February 16, 2016 01:13 PM2016-02-16T13:13:55+5:302016-02-16T13:14:26+5:30
सरदारांवर सर्रास जोक्स केले जातात आणि इंटरनेटव सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणावर प्रसृत केले जातात, ही अत्यंत चुकीची बाब असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - सरदारांवर सर्रास जोक्स केले जातात आणि इंटरनेट व सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणावर प्रसृत केले जातात, ही अत्यंत चुकीची बाब असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. परंतु, हे जोक्स थांबवणार कसे हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाला पडला असून न्यायालयाने याचिकाकर्त्यांनाच सहा आठवड्यांमध्ये उपाय सुचवण्याचे आवाहन केले आहे.
दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीने यासंदर्भात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने वांशिक, एखाद्या समाजाविरोधात विनोद पसरवणे थांबवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची गरज अधोरेखीत केली आणि त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
एखाद्या समाजावर जोक करणे कसं चुकीचे आहे विद्यार्थ्यांसह समाजाला पटवून देणं महत्त्त्वाचं असल्याचं कमिटीनं याचिकेमध्ये म्हटलं होतं आणि यावर बंदी घालण्याची विनंती केली होती.
कुठल्याही समाज हा समाजाच्या हास्याचा विषय होऊ नये असं सांगतानाच, आम्ही देणारे आदेश अमलात येण्याजोगे असावेत असं समजावत सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात असलेल्या मर्यादाही अधोरेखीत केल्या आहेत. त्याचबरोबर लोकांनी सरदारांवर जोक करू नयेत तसेच पसरवू नयेत यासाठी काय मार्गदर्शक तत्त्वे आखता येतील यासंदर्भात सहा आठवड्यात उपाय सुचवण्याचे आवाहनही सर्वोच्च न्यायालयाने गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीला केले आहे.
PIL to ban jokes on Sikhs: SC gives 6-week time to petitioner DSGMC to give suggestion within judicial dynamics so such jokes can be banned
— ANI (@ANI_news) February 16, 2016