चिंताजनक! अवघ्या १२ दिवसांत ५.४ सेमी जमीन खचली; ISRO नं जारी केली सॅटेलाईट ईमेज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 03:17 PM2023-01-13T15:17:38+5:302023-01-13T15:17:56+5:30

एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान जमीन खचण्याचं प्रमाण खूपच कमी होते. यादरम्यान जोशीमठ नऊ सेंटीमीटर खचला होता.

Joshimath sank by 5.4 cm in just 12 days: ISRO report | चिंताजनक! अवघ्या १२ दिवसांत ५.४ सेमी जमीन खचली; ISRO नं जारी केली सॅटेलाईट ईमेज

चिंताजनक! अवघ्या १२ दिवसांत ५.४ सेमी जमीन खचली; ISRO नं जारी केली सॅटेलाईट ईमेज

googlenewsNext

नवी दिल्ली - जोशीमठाबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) धक्कादायक खुलासा केला आहे. इस्रोच्या अहवालानुसार, जोशीमठमध्ये अवघ्या १२ दिवसांत ५.४ सेमी जमीन खचली आहे. इस्रोने जोशीमठची सॅटेलाईट ईमेज देखील प्रसिद्ध केली आहे, त्यानुसार २७ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान जोशीमठची जमीन ५.४ सेंटीमीटरने खचल्याचं दिसून येत आहे. या घटनेची सुरुवात २ जानेवारी २०२२ रोजी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

इस्रोने आपल्या अहवालात म्हटलं आहे की, एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान जमीन खचण्याचं प्रमाण खूपच कमी होते. यादरम्यान जोशीमठ नऊ सेंटीमीटर खचला होता. सबसिडेन्सचा मुकुट जोशीमठ-औली रस्त्याजवळ २१८० मीटर उंचीवर आहे. जमीन खचल्याने जोशीमठ-औली रस्ताही खचणार असल्याची माहिती समोर आली आहे. कार्टोसॅट-2एस उपग्रहाने टिपलेल्या फोटोंमध्ये इस्रोने जोशीमठमधील लष्करी हेलिपॅड आणि नरसिंह मंदिरासह संपूर्ण शहराला संवेदनशील क्षेत्र म्हणून चिन्हांकित केले आहे.

जोशीमठ दरवर्षी २.६० इंचानं खचतोय 
इस्रो व्यतिरिक्त, इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (IIRS) ने देखील सरकारला अहवाल सादर केला आहे. त्यानुसार जोशीमठ दरवर्षी ६,६२ सेमी म्हणजेच सुमारे २.६० इंच खचत आहे. आयआयआरएसने सुमारे दोन वर्षे सॅटेलाईट ईमेजचा अभ्यास केल्यानंतर हा अहवाल तयार केला आहे. IIRS डेहराडूनच्या शास्त्रज्ञांनी जुलै २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत जोशीमठ आणि आसपासच्या सुमारे सहा किलोमीटरच्या सॅटेलाईट ईमेजची स्टडी केली. 

जोशीमठमध्ये भूवैज्ञानिक बदल 
जोशीमठ आणि आसपासच्या परिसरात होत असलेले भूवैज्ञानिक बदल अहवालात दिसले. नुकताच आयआयआरएसने आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये जोशीमठला दरवर्षी ६.६२ सें.मी.च्या अंकाने खाली खचत आहे. त्याचे सॅटेलाईट फोटोही प्रसिद्ध झाले आहे. तसेच, IIRS ने एक व्हिडिओ जारी केला आहे, जो जोशीमठचे 3-D बदल दर्शविले आहेत. 

केवळ जोशीमठच नाही तर संपूर्ण खोऱ्यात भूस्खलनाच्या घटना 
आयआयआरएसने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये हे देखील दिसून आले आहे की भूस्खलन केवळ जोशीमठ शहरात होत नाही. संपूर्ण खोरे त्याच्या जाळ्यात आहे. त्याचे घातक परिणाम येत्या काळात दिसू शकतात असा इशारा दिला आहे. 

Web Title: Joshimath sank by 5.4 cm in just 12 days: ISRO report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :isroइस्रो