तेलंगणात मुलांना मारून पत्रकाराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 04:17 AM2018-06-22T04:17:08+5:302018-06-22T04:17:08+5:30
तेलंगणातील एका पत्रकाराने आपल्या दोन मुलांची हत्या करून, स्वत: आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
हैदराबाद : तेलंगणातील एका पत्रकाराने आपल्या दोन मुलांची हत्या करून, स्वत: आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या पत्नीनेही स्वत:ला गळफास लावून घेतला होता. हे समजताच शेजाऱ्यांनी धाव घेतली. तोपर्यंत पत्रकाराचे निधन झाले होते. पत्नीला वाचवण्यात आले असले तरी तिची प्रकृती चिंताजनक आहे, असे पोलिसांनी सांगितले.
तेलंगणाच्या सिद्दिपेट जिल्ह्यात हा प्रकार घडला. हनुमंत राव असे पत्रकाराचे नाव असून, तो एका तेलगू वृत्तपत्रासाठी काम करीत होता. तो व त्याची पत्नी मीना हिने आपल्या तीन व पाच वर्षे वयाच्या मुलांची हत्या केली. ते दोघे मेले असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच पत्रकार व पत्नीने स्वत:ला गळफास लावून घेतला.
पती व पत्नी दोघे गळफासाने आत्महत्या करीत असल्याचे कसे कोणास ठाऊक; पण शेजाºयांच्या ध्यानात आले. त्यामुळे त्यांनी त्या घराचा लगेच दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दोघांना खाली उतरविले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पत्रकार आधीच मरण
पावला होता. पत्नीवर उपचार
सुरू आहेत. पत्रकार हनुमंत राव बºयाच दिवसांपासून तणावाखाली होता आणि त्यामुळेच त्याने असे
केले असावे, अशी शंका स्थानिक
व निकटवर्तीयांनी व्यक्त केली
आहे. (वृत्तसंस्था)
>कर्जाच्या बोज्यामुळे ?
हनुमंत राव यांच्यावर १0 लाखांचे कर्ज होते, ते फेडणे त्यांना शक्य होत नव्हते. त्यामुळे ज्यांनी या रकमा दिल्या, ते परतफेडीसाठी मागे लागले होते. कर्ज
घेऊ नही ते सध्या आर्थिक विवंचनेत होते, असे पोलिसांना सांगण्यात आले.आम्ही सर्व शक्यता तपासून पाहत आहोत, आत्महत्येस कोणी भरीस घातले होते का, याचीही चौकशी केली जाईल. तीनही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत.