भाजपाध्यक्ष जेपी नड्डांसाठी 2023 'अग्निपथ', 5 राज्यात सरकार वाचवण्याचे तर 4 राज्यात विजयी होण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 01:45 PM2023-01-17T13:45:30+5:302023-01-17T13:46:11+5:30

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जेपी नड्डा यांनाच अध्यक्षपदी कायम ठेवण्यावर एकमत झाल्याची माहिती आहे.

JP Nadda | BJP | 2023 is fire path for BJP president JP Nadda, challenge to save government in 5 states and win in 4 states | भाजपाध्यक्ष जेपी नड्डांसाठी 2023 'अग्निपथ', 5 राज्यात सरकार वाचवण्याचे तर 4 राज्यात विजयी होण्याचे आव्हान

भाजपाध्यक्ष जेपी नड्डांसाठी 2023 'अग्निपथ', 5 राज्यात सरकार वाचवण्याचे तर 4 राज्यात विजयी होण्याचे आव्हान

Next

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी जेपी नड्डा यांनाच अध्यक्षपदी कायम ठेवण्यावर एकमत झाल्याची माहती आहे. नड्डा हे तिसरे असे अध्यक्ष असतील, ज्यांना दुसऱ्यांदा पक्षाची जबाबदारी मिळेल. यापूर्वी राजनाथ सिंह, लालकृष्ण अडवाणी हे दोन किंवा त्याहून अधिक वेळा अध्यक्ष राहिले आहेत. मोदी सरकारमध्ये आरोग्यमंत्री राहिलेल्या जेपी नड्डा यांना संघटनेचा अनुभव आहे. अध्यक्ष होण्यापूर्वी नड्डा हे जम्मू-काश्मीर आणि यूपीचे प्रभारी सरचिटणीस होते. 2010 मध्ये नड्डा यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला, तेव्हा नितीन गडकरींनी त्यांची पक्षाचे सचिव म्हणून नियुक्ती केली होती.

हिमाचलमध्ये जोरदार पराभव
हिमाचल प्रदेश हे जेपी नड्डा यांचे गृहराज्य. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हिमाचलमध्ये भाजपच्या पराभवानंतर जेपी नड्डा यांची खुर्ची अडचणीत येईल, असे मानले जात होते, मात्र तसे झाले नाही. यामागे काही मोठी कारणे आहेत. यातील एक म्हणजे, जेपी नड्डा यांचे संघटन कौशल्य.

मोदी-शहांच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात तज्ज्ञ 
2021 मध्ये मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार होते. पंतप्रधानांच्या निवासस्थानी पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यात नवीन नावांबाबत बैठक झाली. बैठकीत काही तगड्या मंत्र्यांना हटवण्यावरही एकमत झाले. यामध्ये रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर आणि हर्षवर्धन यांसारख्या नावांचा समावेश होता. मंत्र्यांचे राजीनामे मिळवण्याची जबाबदारी जेपी नड्डा यांच्यावर सोपवण्यात आली होती. नड्डा यांनी सर्व 12 मंत्र्यांना हटवण्यास सांगितले आणि त्यांचे राजीनामे पंतप्रधान कार्यालयाला पाठवले. ही योजना इतकी सुरळीतपणे पार पडली की सुरुवातीला कुणाला सुगावाही लागला नाही.

बिहार-उत्तरप्रदेशातील सर्वोत्तम कामगिरी
जेपी नड्डा यांना 2020 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले. यानंतर जवळपास 14 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. यातील 5 राज्यांमध्ये भाजपने एकट्याने सरकार स्थापन केले, तर 2 राज्यांमध्ये आघाडीसोबत सरकार स्थापन करण्यात यश आले. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बिहार आणि यूपीमध्ये चांगली कामगिरी केली. भाजप 74 जागा जिंकून बिहारमधील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला, तर यूपीमध्ये 250 हून अधिक जागा जिंकून सरकार स्थापन केले. या दोन राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 120 जागा आहेत.

9 राज्यांमध्ये पक्ष मजबूत करणार 
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या पहिल्या दिवशी जेपी नड्डा यांनी सर्व सरचिटणीस आणि प्रभारींना पुढील 9 निवडणुका जिंकण्यासाठी काम करण्यास सांगितले. नड्डा म्हणाले – पंतप्रधान जेवढे काम करतात, तेवढेच तुम्ही संघटनेत केले पाहिजे. 2023 मध्ये ज्या 9 राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यापैकी 5 राज्यांमध्ये भाजप युतीचे सरकार आहे. म्हणजेच या पाच राज्यांतील सरकार वाचवण्याचेही भाजपसमोर आव्हान आहे. याशिवाय, तेलंगणा, राजस्थान, मिझोराम आणि छत्तीसगडमध्ये विजयाचे आव्हान आहे.

Web Title: JP Nadda | BJP | 2023 is fire path for BJP president JP Nadda, challenge to save government in 5 states and win in 4 states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.