न्यायाधीशांनी पीडितेच्या हातावरचा टॅटू पाहिला आणि आरोपीला...

By बाळकृष्ण परब | Published: February 13, 2021 02:36 PM2021-02-13T14:36:43+5:302021-02-13T14:38:20+5:30

Court News : कोर्टामध्ये सुनावणीदरम्यान अगदी किरकोळ, छोटे पुरावेही महत्त्वपूर्ण ठरतात. अशीच एक घटना दिल्ली उच्च न्यायालयात घडली आहे.

The judge saw the tattoo on the victim's hand and granted immediate bail to the accused | न्यायाधीशांनी पीडितेच्या हातावरचा टॅटू पाहिला आणि आरोपीला...

न्यायाधीशांनी पीडितेच्या हातावरचा टॅटू पाहिला आणि आरोपीला...

Next

नवी दिल्ली - कोर्टामध्ये सुनावणीदरम्यान अगदी किरकोळ, छोटे पुरावेही महत्त्वपूर्ण ठरतात. अशीच एक घटना दिल्ली उच्च न्यायालयात घडली आहे. दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीशांनी बलात्कार केल्याच्या प्रकरणातील आरोपीला केवळ पीडित महिलेच्या हातावर आरोपीच्या नावाचा टॅटू कोरलेला आहे हे पाहून जामीन दिला. पीडित महिलेने आरोपीने आपल्या हातावर जबरदस्तीने आपले नाव गोंदवले होते असा दावा केला होता.

हायकोर्टाने याबाबत निरीक्षण नोंदवताना सांगितले की, अशा प्रकारचे टॅटू गोंदवणे हे सामान्य काम नाही. न्यायमूर्ती रजनीश भटनागर यांनी सांगितले की, माझ्या मते असे टॅटू गोंदवणे ही एक कला आहे. त्यासाठी एका विशिष्ट्य मशीनची आवश्यकता असते. त्याशिवाय, फिर्यादीच्या हातावर आहेत तशा प्रकारचे टॅटू कोरणे हे सोपे काम नाही.

दरम्यान, आरोपीने धमकी देऊन ब्लॅकमेल करून आपल्याला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले होते. हे शरीरसंबंध २०१६ ते २०१९ दरम्यान सुरू होते, असा दावा पीडित महिलेने केला आहे. तर आरोपीने सांगितले की, तक्रारदार महिला ही विवाहित होती. ती माझ्यावर प्रेम करायची. तसेच आपण नात्यात असल्याचा दावा करायची.

आरोपीने आपली बाजू मांडताना महिलेच्या हातावर गोंदवलेल्या टॅटूचे फोटोही दाखवले. तसेच या महिलेने आपल्यासोबत अनेक टॅटूही काढले होते असे सांगितले. आमची मैत्री फेसबूकच्या माध्यमातून झाली होती, मी तिला फ्रेंड रिक्वेस्टही पाठवली होती, असे सांगितले.

Web Title: The judge saw the tattoo on the victim's hand and granted immediate bail to the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.