कोर्टातच न्यायाधीश अन् वकीलांचा मोठा वाद, घोटाळ्याचे केले आरोप; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 04:18 PM2024-10-29T16:18:49+5:302024-10-29T16:19:09+5:30

जिल्हा न्यायाधीशांच्या निर्णयावरून गाझियाबाद जिल्हा न्यायालयात वकील आणि न्यायाधीशांमध्ये मोठा वाद झाल्याचे समोर आले.

Judges and lawyers had a big argument in the court itself, accusations of fraud were made; What exactly is the case? | कोर्टातच न्यायाधीश अन् वकीलांचा मोठा वाद, घोटाळ्याचे केले आरोप; नेमकं प्रकरण काय?

कोर्टातच न्यायाधीश अन् वकीलांचा मोठा वाद, घोटाळ्याचे केले आरोप; नेमकं प्रकरण काय?

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्हा न्यायालयात मंगळवारी १२ वाजण्याच्या सुमारास एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान जिल्हा न्यायाधीश अनिल कुमार यांच्या निर्णयामुळे वकील संतप्त झाले. दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची सुरू झाली.
परिस्थिती चिघळल्यावर न्यायाधीशांना पोलिसांना पाचारण करावे लागले. मात्र, पोलिस आल्यानंतर प्रकरण शांत होण्याऐवजी चिघळले आणि पोलिस आणि वकिलांमध्ये वाद विकोपाला गेला.

यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला, यात ज्येष्ठ वकील नाहर सिंह गंभीर जखमी झाले.

कोर्टात नेमकं काय घडलं?

या संपूर्ण गदारोळानंतर वकिलांनी बारच्या सभागृहात बैठक घेऊन जिल्हा न्यायाधीशांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. जिल्हा न्यायाधीश अनिल कुमार हे फसवणुकीच्या आरोपींची बाजू न ऐकता जामीनावर निर्णय देत आहेत, असा आरोप वकील नाहर सिंह यादव यांनी केला आहे.
वकिलांनी यावेळी विरोध केल्यावर न्यायाधीशांनी पोलिसांना बोलावून लाठीचार्ज केला, असा आरोप नाहर सिंह यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डासना येथील एलएमसीच्या जमिनीला घेराव घालून सौदा केल्याचा प्रकार समोर आला आहे.
एमएलसी जमिनीचा ८० लाख रुपयांना सौदा करून ही रक्कम तक्रारदाराकडून घेतल्याचा आरोप आहे. यामध्ये फसवणूक करण्यात आली.
आज जिल्हा न्यायाधीश अनिल कुमार यांच्या न्यायालयात आरोपींच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली, त्यादरम्यान युक्तिवाद झाला.

जिल्हा न्यायाधीश न्यायालयात न्यायाधीश आणि वकिलांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर पोलिसांनी येऊन वकिलांवर कडक कारवाई केल्याने प्रकरण अधिकच चिघळले. यावेळी काही लोकांनी न्यायालयाच्या आवारात तोडफोड केली. डीव्हीआरमधील तोडफोडीबरोबरच मेटल डिटेक्टरही तोडून तोडण्यात आले.

Web Title: Judges and lawyers had a big argument in the court itself, accusations of fraud were made; What exactly is the case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.