न्यायाधीशांचे फोन टॅप होत आहेत - केजरीवाल यांचा सनसनाटी आरोप

By admin | Published: October 31, 2016 02:16 PM2016-10-31T14:16:50+5:302016-10-31T14:16:50+5:30

देशात न्यायाधीशांचे फोन टॅप केले जात असून, हा न्यायपालिकेच्या स्वायत्ततेवरील हल्ला असल्याचा आरोप केजरीवाल यांनी सोमवारी केला

The judge's phones are being tapped - Kejriwal's sensational charge | न्यायाधीशांचे फोन टॅप होत आहेत - केजरीवाल यांचा सनसनाटी आरोप

न्यायाधीशांचे फोन टॅप होत आहेत - केजरीवाल यांचा सनसनाटी आरोप

Next
ऑनलाइन लोकमत
 नवी दिल्ली, दि. 31 -  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. देशात न्यायाधीशांचे फोन टॅप केले जात असून, हा न्यायपालिकेच्या स्वायत्ततेवरील हल्ला असल्याचा आरोप केजरीवाल यांनी सोमवारी केला. मात्र कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केजरीवाल यांनी केलेले आरोप फेटाळून लावले.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केजरीवाल यांनी हे सनसनाटी आरोप करत खळबळ उडवली. विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद आणि सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर हेही उपस्थित होते. केजरीवाल म्हणाले, " न्यायाधीशांचे फोन टॅप असल्याचे  न्यायाधीश एकमेकांना सांगत असताना मी ऐकले आहे. न्याधीशांचे फोन टॅप होणे योग्य नाही. आता ही गोष्ट खरी की खोटी हे मला माहीत नाही. पण न्यायाधीशांचे फोन टॅप होत असतील तर ती अत्यंत गंभीर बाब आहे."
न्यायाधीशांचे फोन टॅप होणे हे  न्यायसंस्थेच्या स्वायत्ततेला बाधा आणणारे असल्याचेही केरीवाल यांनी सांगितले. "जर एखादा न्यायाधीश काही चुकीचे कृत्य करत असेल. तरीही त्याचा फोन टॅप करता कामा नये. त्याचाविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत," असेही केजरीवाल म्हणाले.  
मात्र केजरीवाल यांच्या या सनसनाटी आरोपांना केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी याच कार्यक्रमात प्रत्युत्तर देत सर्व आरोप फेटाळून लावले. "न्यायाधीशांचे फोन टॅप होत असल्याचा आरोप पूर्णपणे निराधार आणि आहेत. तसेच मोदी सरकार न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी  कटीबद्ध आहे," असे प्रसाद यांनी सांगितले. 
 
 
 

Web Title: The judge's phones are being tapped - Kejriwal's sensational charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.