न्यायाधीशांनी स्वत:ला केले सुनावणीपासून वेगळे

By Admin | Published: September 4, 2015 10:30 PM2015-09-04T22:30:24+5:302015-09-04T22:30:24+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाने २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष सरकारी वकिलाला हटविण्याच्या एनआयएच्या निर्णयाविरुद्ध दाखल

Judges separated themselves from the hearings themselves | न्यायाधीशांनी स्वत:ला केले सुनावणीपासून वेगळे

न्यायाधीशांनी स्वत:ला केले सुनावणीपासून वेगळे

googlenewsNext

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाने २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष सरकारी वकिलाला हटविण्याच्या एनआयएच्या निर्णयाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीपासून स्वत:ला वेगळे केले आहे. ‘मी या प्रकरणात काही आरोपींची वकिली केली होती,’ असे सांगत न्या. यू. यू. ललित यांनी या प्रकरणाच्या सुनावणीपासून स्वत:ला वेगळे केले.
हे प्रकरण सरन्यायाधीशांच्या समक्ष सूचीबद्ध करण्यात यावे. सरन्यायाधीश हे प्रकरण दुसऱ्या पीठाच्या सुपूर्द करतील, असे न्या. एफ. एम. आय. कलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले आहे. विद्यमान पीठ या प्रकरणाची सुनावणी करण्याचा निर्णय घेणार असेल तर त्यास आपली कसलीही हरकत नाही, असे जनहित याचिका दाखल करणारे हर्ष मंडेर यांच्या वकील इंदिरा जयसिंग म्हणाल्या. तथापि न्यायालयाने त्यांची ही विनंती खारीज केली.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींबाबत ‘सौम्य’ धोरण अवलंबिण्यासाठी आपल्यावर दबाव टाकून एनआयए फिर्यादी पक्षाच्या कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप करून विशेष सरकारी वकिलांनी खळबळ उडविली होती.

Web Title: Judges separated themselves from the hearings themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.