जुगाड बेकार! 'त्या' नोटांवर घेतलेल्या विमान तिकिटांचा परतावा मिळणार नाही

By admin | Published: November 10, 2016 07:25 PM2016-11-10T19:25:03+5:302016-11-10T19:25:03+5:30

500 आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा देऊन आरक्षित करण्यात आलेली तिकिटे रद्द करता येणार नाहीत. तसेच त्यांचा परतावा मिळणार नसल्याचे काही विमान कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

Jugaad is useless! Air tickets will not be refunded on those 'notes' | जुगाड बेकार! 'त्या' नोटांवर घेतलेल्या विमान तिकिटांचा परतावा मिळणार नाही

जुगाड बेकार! 'त्या' नोटांवर घेतलेल्या विमान तिकिटांचा परतावा मिळणार नाही

Next
> ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली. दि. 10 -  सरकारने 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या नोटा खपवण्यासाठी अनेकांनी वेगवेगळे जुगाड करण्यास सुरुवात केली. त्यातल्या काही जणांनी तर रेल्वे आणि विमानाची तिकिटेही आरक्षित केली. नंतर आरक्षण रद्द करून पैसे परत मिळवता येतील, असा त्यांचा होरा होता. पण या जुगाडखोरांना विमान कंपन्यांनी दणका दिला आहे.  500 आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा देऊन आरक्षित करण्यात आलेली तिकिटे रद्द करता येणार नाहीत. तसेच त्यांचा परतावा मिळणार नसल्याचे काही विमान कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.    
जुन्या नोटा देऊन खरेदी करण्यात आलेले विमान तिकिटे रद्द करता येणार नाहीत. तसेच त्यांच्यावरचा परतावाही मिळणार नाही, असे विमान कंपन्यांनी गुरुवारी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावरून अशा आशयाचे वृत्त प्रकाशित झाले आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यानंतर काही  जणांकडून या नोटा बदलून घेण्याऐवजी विमान तिकीटांचे आरक्षण करण्यात येत होते.  
 विमानतळांवरील तिकीट खिडक्यांवरील तिकीटविक्रीत 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसत आहे. यापैकी बऱ्याचजणांकडून तात्काळ तसेच पुढच्या काळातील प्रवासासाठी तिकिटे आरक्षित करण्यात येत होती, असे स्पाइसजेटचे प्रवक्ते अजय जासरा यांनी सांगितले. इतर कंपन्यांच्या प्रवक्तांचीही अशीच प्रतिक्रिया होती.यापैकी काही लोकांनी ही तिकिटे नंतर रद्द करून पैसे परत मिळवता येतील, या उद्देशाने खरेदी केल्याची शक्यताही काही अधिकाऱ्यांनी वर्तवली. 

Web Title: Jugaad is useless! Air tickets will not be refunded on those 'notes'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.