दिल्लीतील 'जंग' थांबली! उपराज्यपाल नजीब जंग यांचा अचानक राजीनामा
By admin | Published: December 22, 2016 04:34 PM2016-12-22T16:34:01+5:302016-12-22T21:44:04+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी उडणाऱ्या खटक्यांमुळे सतत चर्चेत असलेले दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी आज
Next
>
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - गेल्या दोन वर्षांपासून अधिकारांच्या वाटणीवरून दिल्लीत सुरू असणारी 'जंग' आता थांबणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी उडणाऱ्या खटक्यांमुळे सतत चर्चेत असलेले दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी आज संध्याकाळी अचानक राजीनामा दिला. जंग यांचा राज्यपालपदाचा दीड वर्षांचा कार्यकाळ अद्याप शिल्लक होता. मात्र त्यांच्या अचानक राजीनामा देण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
गेल्या साडे तीन वर्षांपासून दिल्लीचे उपराज्यपाल म्हणून काम पाहत असलेल्या नजीब जंग आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात अनेक मुद्यांवरून तीव्र मतभेद निर्माण झाले होते. दोघांकडून एकमेंकांवर आरोप प्रत्यारोप होत होते. त्यामुळे जंग आणि केजरीवाल यांच्यातील विवाद देशपातळीवर चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान, आज जंग यांनी अचानक राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आज दुपारी जंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा केंद्राकडे पाठवला. तसेच केलेल्या सहकार्यासाठी पंतप्रधान कार्यालय आणि दिल्लीच्या जनतेचे आभार मानले.
जंग यांच्या राजीनाम्यावरून आरोप प्रत्यारोप
दिल्लीचे राज्यपाल नजीव जंग यांनी तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यानंतर दिल्लीत आरोप प्रत्यारोपांनंतर दिल्लीत आरोपप्रत्यारोपांना उत आला आहे. एकीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जंग यांचा राजीनामा धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे आप आणि भाजपमध्ये झालेल्या छुप्या करारामुळे जंग यांनी राजीनामा दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.