ज्युनिअर डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरण; CBI ची मोठी कारवाई, आरजी कारचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 12:14 AM2024-09-15T00:14:47+5:302024-09-15T00:19:13+5:30

यापूर्वी सीबीआयने घोष यांना आर्थिक अनियमिततेप्रकरणी अटक केली होती. आता बलात्कार-हत्ये प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे.

Junior doctor rape-murder case; Big action by CBI, ex-principal of RG Car Sandeep Ghosh arrested | ज्युनिअर डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरण; CBI ची मोठी कारवाई, आरजी कारचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक

ज्युनिअर डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरण; CBI ची मोठी कारवाई, आरजी कारचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक

 
कोलकाता आरजी कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एका ज्युनिअर डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्ये प्रकरणी आता  सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक केली आहे. ते 23 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.

यापूर्वी सीबीआयने घोष यांना आर्थिक अनियमिततेप्रकरणी अटक केली होती. आता बलात्कार-हत्ये प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. सीबीआयने आरजी कार बलात्कार प्रकरणी एफआयआर दाखल कण्यास झालेला उशीर आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवत संदीप घोष आणि तळा पोलीस ठाण्याचे एसएचओ अभिजीत मंडल यांना अटक केली आहे. संदीप यांना रविवारी सियालदह न्यायालयात हजर केले जाईल.

संदीप घोष यांना एकांत कोठडीत ठेवण्यात आले आहे -
सध्या घोष यांना प्रेसीडेंसी सेंट्रल जेलच्या एका एकांत कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यांना येथे याच आठवड्याच्या सुरुवातीला आणण्यात आले होते. सीबीआयने संदीप घोष यांना 2 सप्टेंबरला अटक केली होती. कोलकता उच्च न्यायालयाने परिसरात एका ज्युनिअर डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येप्रकरणी सीबीआई चौकशीचे आदेश दिले होते. 

कोलकात्यातील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये 9 ऑगस्टरोजी एक 31 वर्षीय ज्युनिअर डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. तिच्यावर हत्येपूर्वी कृरपणे बलात्कार झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले होते. याप्रकरणी देशभरात संतापाची लाट आहे.
 

Web Title: Junior doctor rape-murder case; Big action by CBI, ex-principal of RG Car Sandeep Ghosh arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.