कनिष्ठ नोकऱ्या मुलाखतीविना!

By admin | Published: October 26, 2015 02:55 AM2015-10-26T02:55:21+5:302015-10-26T02:55:21+5:30

केंद्र सरकारच्या अराजपत्रित गट डी, सी आणि बी दर्जांच्या कनिष्ठ पदांसाठी पुढील वर्षी १ जानेवारीपासून मुलाखतीची गरज उरणार नाही,

Junior Jobs Without Interview! | कनिष्ठ नोकऱ्या मुलाखतीविना!

कनिष्ठ नोकऱ्या मुलाखतीविना!

Next

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अराजपत्रित गट डी, सी आणि बी दर्जांच्या कनिष्ठ पदांसाठी पुढील वर्षी १ जानेवारीपासून मुलाखतीची गरज उरणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात केली. नोकरीतील भ्रष्टाचार संपविण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कनिष्ठ पदांची भरती करताना मुलाखती घेण्याची प्रक्रिया दूर सारण्याची गरज मोदींनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना प्रतिपादित केली होती. अशा पदांसाठी मुलाखती ठेवल्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळतो. ‘दलाल’ गरिबांना लुटतात. रोजगार देण्याच्या नावाखाली लोकांना लुटले जाते. नोकरीही दिली जात नाही. मग छोट्या पदांसाठी मुलाखत ठेवण्याची काय गरज आहे? एक-दोन मिनिटांच्या मुलाखतीत त्या उमेदवाराचे मूल्यांकन कसे करणार? मुलाखतीला जाताना युवक शिफारस मिळवतात. विधवा मातेलाही तिच्या मुलांना मुलाखतीला पाठविताना शिफारस मिळविण्यासाठी पायपीट करावी लागते, असे मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना म्हटले होते.
बँकेत सोने ठेवा...
सुवर्णमुद्रा योजनेनुसार तुम्ही बँकेत सोने जमा करून त्यावर रोख रकमेप्रमाणे व्याज मिळवू शकाल. सोने लॉकरमध्ये ठेवण्याची परंपरा राहिली आहे. त्यासाठी तुम्ही बँकेला पैसे देता. आता त्याच सोन्यावर पैसे मिळवा, असेही ते म्हणाले.
>>काय असतील सुवर्णरोखे
सुवर्णरोखे योजनेची माहिती देताना ते म्हणाले की, लोकांना सोन्याचे बार नव्हे, तर एक कागदाचा तुकडा दिला जाईल. त्याची किंमत सोन्याएवढीच असेल.
तो तुम्ही परत कराल तेव्हा त्याच्या किमतीएवढा पैसा मिळेल. त्यामुळे तुम्हाला सोने खरेदी करण्याची व ते कुठे ठेवावे ही चिंता उरणार नाही. काही आठवड्यांत या योजनेला प्रारंभ होईल.
दिवाळीत सुवर्णमुद्रेसह विविध योजनांचा प्रारंभ
दिवाळीच्या
पूर्वसंध्येला सुवर्णमुद्रा, सुवर्णरोखे, अशोक
चक्र असलेल्या सुवर्णनाण्यांसह विविध योजनांचा शुभारंभ
केला जाणार आहे. त्यामुळे आर्थिक विकासाला वेगळी दिशा दिली जाईल, अशी आशा मोदींनी व्यक्त केली. आपल्या देशात सोने हा सामाजिक जीवनाचा भाग बनला आहे. आर्थिक संकटाच्या काळात पारंपरिकरीत्या सोन्याला आर्थिक सुरक्षा मानले जात आहे. गेल्या अर्थसंकल्पात दिलेल्या वचनाची पूर्तता करताना आनंद होत आहे, असे ते म्हणाले. धनत्रयो-दशीला मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते, त्याच दिवशी या योजनांचे लोकार्पण केले जाईल.
>>> जाती-धर्मातील विविधता हेच भारताचे सौंदर्य आहे. विचार आणि अभिव्यक्तीच्या माध्यमातून ऐक्याचा मंत्र पुढे नेला जावा, या शब्दांत मोदींनी सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन केले.
> जातीय हिंसाचार व चिथावणीजनक विधानांचा त्यामागे
संदर्भ होता. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती येऊ घातली असताना त्यांनी शांतता, सलोखा आणि ऐक्य हीच प्रगतीची
३ मुख्य अंगे आहेत. आपले विचार, वर्तणूक व अभिव्यक्ती या माध्यमातून ऐक्याचाच मंत्र दिला जावा, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: Junior Jobs Without Interview!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.