जंकफूडमुळे आपली मुलं राहतील कायम दुबळी
By admin | Published: May 9, 2017 03:32 PM2017-05-09T15:32:01+5:302017-05-09T15:32:01+5:30
वाचवा आपल्या मुलांना. महाराष्ट शासनापाठोपाठ खाद्य सुरक्षा प्राधिकरणाचीही ‘बंदी’ची शिफारस.
Next
- मयूर पठाडे
जंक फूडनं आपल्या अरोग्याची वाट लागते हे खरं तर सगळ्यांनाच माहीत आहे, पण आरोग्याची नेमकी काय हानी होते हे एकतर आपण समजून घेत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष तरी करतो. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं आता शाळांतील उपहारगृहांमध्ये जंकफूड विक्रीवर बंदी घातली आहे.
महाराष्ट्र शासनाचा हा आदेश आल्यानंतर लगोलग भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्राधिकरणानंही (फूड सेफ्टी अँण्ड स्टॅण्डर्डस अँथॉरिटी ऑफ इंडिया, एफएसएसएआय) पॅकेज्ड जंक फूडवर अधिकचा टॅक्स लागू करण्याची आणि लहान मुलांसाठीचे टीव्हीवरील चॅनेल्स, वेबसाइट्स, सोशल मिडियावरील जंक फूडच्या जाहिरातींवर बंदी आणण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
भारताच्या भावी पिढीचं रक्षण करायचं तर या गोष्टी अत्यावश्यक असून टीव्हीवरील लहान मुलांचे कार्यक्रम आणि लहान मुलांच्या चॅनेल्सवरील जंकफूडच्या जाहिरातींवर सरसकट बंदी घातली पाहिजे असंही प्राधिकरणानं म्हटलं आहे. त्यामुळे चिलीसारख्या देशांनी अशा जाहिरातींवर पूर्णत: बंदी घातली आहे. ज्या प्रि-पॅकेज्ड फूड्समध्ये मोठय़ा प्रमाणात मीठ आणि फॅट्स आहेत, त्याचप्रमाणे साखर असलेल्या पेयांवर अधिकचा टॅक्स लागू करावा अशीही शिफारस समितीतील विविध क्षेत्रातील 11 तज्ञांनी केली आहे.
जंकफुडमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर खूप मोठा दुष्परिणाम होतात, पण मोठी माणसंही त्यातून वाचू शकत नाहीत.
जंकफूडमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
5- रक्तातील साखरेची पातळी कमी-जास्त होणे
जंक फूडमध्ये रिफाइन्ड साखरेचं प्रमाण खूप मोठय़ा ्रप्रमाणात असतं. शिवाय त्यात काबरेहायड्रेट्स आणि प्रोटिन्सचं प्रमाण नगण्य असतं. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सारखी खालीवर होत राहते. त्यामुळे पोटात सारखं काहीतरी ढकलत राहावंसं वाटतं.
6- मेंदुच्या कार्यक्षमतेवर परिणाम
शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार तुमच्या खाण्यात जर जंकफूडचं प्रमाण कमी असेल तर मेंदूचं चलनवलन नीट होत नाही. नवीन गोष्टी शिकण्याची तुमची क्षमताही कमी होते. एका टप्प्यापेक्षा अधिक पुढे तुम्ही जाऊ शकत नाही.
7- हृदयविकार
जंकफूडच्या अतिरेकी सेवनामुळे हृदयविकाराची शक्यताही खूप मोठय़ा प्रमाणात वाढते.
8- किडनीचे विकार
विषारी आणि शरीराला नको असलेले पदार्थ फिल्टर करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम किडनीला करावं लागतं. जंकफूडच्या सातत्यानं सेवनामुळे किडनीचं हे काम खूप मोठय़ा प्रमाणात वाढतं आणि त्यामुळे किडनीचे विकार होण्याची शक्यता दाट होते.
9- लिव्हर डॅमेज
- मद्यसेवनामुळे आपल्या यकृतावर जे दुष्परिणाम होतात, अगदी तसेच परिणाम जंकफूडमुळे होतात. आपल्या यकृताचं काम त्यामुळे बिघडू शकतं.
10- कॅन्सर
जंकफूडमध्ये तंतूमय पदार्थांचा अभाव असतो. आपल्या पचनाच्या शक्तीवर तर त्यामुळे परिणाम होतोच, पण कॅन्सरची शक्यताही त्यामुळे खूप मोठय़ा प्रमाणात बळावते.