फक्त 1 मेसेज आणि कायमची बंद होईल Corona Caller Tune, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 18:20 IST2021-09-16T18:15:34+5:302021-09-16T18:20:21+5:30
कोरोनाची सुरुवात झाल्यापासून सर्व टेलीकॉम कंपन्यांनी कोरोनाची माहिती देण्यासाठी कॉलरट्यून सुरू केली होती.

फक्त 1 मेसेज आणि कायमची बंद होईल Corona Caller Tune, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
नवी दिल्ली: भारतात कोरोना महामारीची सुरुवात झाल्यापासून प्रत्येकानं कोरोना कॉलरट्यून ऐकली असेल. अगदी कोरोनाच्या सुरुवातीपासूनच ही कॉलरट्यून ऐकू येत आहे. आता लोकही कोरोनाबाबत जागरुक झाले आहेत. पण, तरीदेखील आजही ही कॉलरट्यून ऐकवली जात आहे. पण, आता ही कॉलरट्यून तुम्ही बंद करू शकता.
एअरटेल यूजर्ससाठी
एअरटेल यूजर्सनी ही कोरोना कॉलरट्यून बंद करण्यासाठी आपल्या नंबरवरुन *646 *224# डायल करावे. त्यानंतर तुम्हाला ही ट्यून बंद करण्यासाठई 1 नंबर दाबावा लागेल. यानंतर ही कॉलरट्यून कायमची बंद होईल.
वीआय यूजर्ससाठी
वोडाफोन-आयडिया किंवा वीआय वापरणाऱ्यांना आपल्या नंबरवरुन कँसलेशन रिक्वेस्टला Text फॉर्मेटमध्ये पाठवावे लागेल. तुमच्या फोनवरुन "CANCT" टाइप करुन 144 नंबरवर मेसेज पाठवा. हा मेसेज पाठवल्यानंतर काही वेळातच कोरोना कॉलरट्युन बंद झाल्याचा मेजेस तुम्हाला मिळेल.
जियो यूजर्ससाठी
जियो कंपनीचे सीमकार्ड वापरणाऱ्यांनी आपल्या फोनवरुन 'STOP' मेसेज टाइप करुन 155223 वर पाठवावा. रिक्वेस्ट प्रोसेस्ड झाल्यानंतर तुमची कोरोनाट्यून बंद होईल.
बीएसएनएल यूजर्ससाठी
बीएसएनएल कस्टमर्सने आपल्या नंबरवरुन 56700 किंवा 5699 नंबरवर 'UNSUB' असा मेसेज टाईप करुन पाठवावा. यानंतर कॉलरट्यून बंद होईल.