अवघ्या ४ तासात शहर चकाचक ६६१ टन कचरा उचलला: नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने राबविली सफाई मोहीम

By admin | Published: December 14, 2015 12:17 AM2015-12-14T00:17:23+5:302015-12-14T00:17:23+5:30

जळगाव : डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे तब्बल पाच हजार २०० सेवकांनी रविवारी सकाळी ७ ते ११ या वेळात शिस्तबद्ध व नियोजनबद्धरितीने सफाई मोहीम राबवित अवघ्या चार तासात शहर चकाचक केले. मात्र शहरातील सफाईची जबाबदारी असलेल्या मनपा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी या मोहीमेच्या मनपाजवळील शुभारंभ कार्यक्रमाकडे देखील फिरकण्याची तसदी घेतली नाही. एखादीस्वयंसेवीसंस्थाएकादिवसातशहरचकाचककरुशकतेतरमनपाकडेप्रचंडयंत्रणाअसतानाहीशहरचकाचककाहोऊशकतनाही,असाप्रश्नयानिमित्तानेजळगावकरांकडूनउपस्थितहोतआहे.

In just 4 hours, City pauses 661 tonnes of garbage lifted: Sanasi campaign implemented by Nanasaheb Dharmadhikari Pratishthan | अवघ्या ४ तासात शहर चकाचक ६६१ टन कचरा उचलला: नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने राबविली सफाई मोहीम

अवघ्या ४ तासात शहर चकाचक ६६१ टन कचरा उचलला: नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने राबविली सफाई मोहीम

Next
गाव : डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे तब्बल पाच हजार २०० सेवकांनी रविवारी सकाळी ७ ते ११ या वेळात शिस्तबद्ध व नियोजनबद्धरितीने सफाई मोहीम राबवित अवघ्या चार तासात शहर चकाचक केले. मात्र शहरातील सफाईची जबाबदारी असलेल्या मनपा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी या मोहीमेच्या मनपाजवळील शुभारंभ कार्यक्रमाकडे देखील फिरकण्याची तसदी घेतली नाही. एखादीस्वयंसेवीसंस्थाएकादिवसातशहरचकाचककरुशकतेतरमनपाकडेप्रचंडयंत्रणाअसतानाहीशहरचकाचककाहोऊशकतनाही,असाप्रश्नयानिमित्तानेजळगावकरांकडूनउपस्थितहोतआहे.
मनपाजवळ शुभारंभ
मनपाच्या सतरा मजली इमारतीजवळ सकाळी ७ वाजता या मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम झाला. यावेळी महापौर राखी सोनवणे, खान्देशविकासआघाडीच अध्यक्ष रमेशदादा जैन, माजी स्थायी समिती सभापती नितीन ल‹ा, स्थायी समिती सभापती नितीन बरडे, भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, मोहन सोनवणे, सरिता नेरकर यांच्यासह काही मोजकी मंडळी व प्रतिष्ठानची सेवक मंडळी उपस्थित होती. तसेच मनपाचे प्रभाग अधिकारी, आरोग्य निरीक्षक आदी उपस्थित होते.
घड्याळाच्या काट्यावर काम
स्वच्छ भारत अभियानाचे राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत व धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ वाजेपासून मोहीम सुरू होणार असे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी प्रतिष्ठानचे जिल्हाभरातील सेवक त्यांच्या नेमून दिलेल्या जागी सात वाजेच्या आधीच हजर होते. ७ वाजताच त्यांनी सफाई मोहीमेला प्रारंभ केला.
सेवकांचे दहा गट
प्रतिष्ठानने या मोहीमेचे अचूक नियोजन केले होते. सुमारे पाच हजार २०० सेवकांनी या मोहीमेत सहभाग घेतला होता. त्यांचे प्रत्येकी ४५० ते ५०० सेवकांचे शहरात १० गट केले होते. या दहा गटांचे सफाईसाठी वाटून दिलेल्या क्षेत्रानुसार आणखी ५०, १००, १५० च्या संख्येत उपगट तयार करण्यात आले होते.
त्यावर एक गटप्रमुख नेमून दिला होता. त्या प्रमुखांना त्यांच्या गटामार्फत सफाई करण्याचा भाग ठरवून दिलेला होता. खान्देश सेंट्रलच्या आवारात अनेक पथके जमलेली दिसत होती. त्यांचे प्रमुख त्यांना ठरवून दिलेल्या विभागाकडे जाण्याच्या सूचना देत होते. त्यानुसार रांगेत ही मंडळी, झाडू, टोपल्या, फावडे आदी स्वत:च आणलेले साहित्य घेऊन जाताना दिसत होती. कॉलनी एरियातील पथके आधीच ठरल्यानुसार त्या ठिकाणी सकाळीच हजर झालेली होती. आदेशाची वाट न पाहता सात वाजताच त्यांनी सफाई मोहीमेस प्रारंभ केल्याचे दिसून आले.
---- इन्फो-----
तुरीच्या तराट्याचे झाडू अन् पिशव्यांचे हातमोजे
प्रतिष्ठानचे सेवक सफाईसाठी स्वत:चे साहित्य घेऊन आलेले होते. ग्रामीण भागातून आलेल्या सेवकांनी तुरीच्या तराट्यांचे झाडू करून आणलेले होते. तसेच थंडीमुळे हाताला झाडू टोचत असल्याने तसेच कचरा उचलण्यासाठी हातात हातमोजे म्हणून अनेकांनी प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरीबॅग) घातलेल्या होता. काहींनी तोंडाला मास्क बांधले होते. मात्र अनेकांनी तोंडाला काहीही न बांधताच सफाई मोहीम राबविली.
---- इन्फो-----
जिल्हाधिकार्‍यांचा सहभाग
जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी सुद्धा या स्वच्छता मोहीमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.
---- इन्फो-----
घाणेरड्या गल्ल्याही झाल्या स्वच्छ
मनपाचे सफाई कर्मचारी पगार घेऊन देखील सफाई करीत नाहीत, त्यापेक्षा कितीतरी पट अधिक चांगली मोहीम यासेवकांनी राबविली. अनेक गल्ल्यांमध्ये तर महिनोंमहिने मनपाचे कर्मचारी सफाईच करत नाहीत. कचर्‍याचे ढीग पडून असतात, अशा गल्ल्याही या सेवकांनी अवघ्या पंधरा-वीस मिनीटांत चकाचक केल्या. सतरा मजलीसमोरील गांधीभवनच्या शेजारील गल्लीतही अशाचप्रकारे घाण साचलेली असते. ती गल्ली देखील काही मिनिटांतच चकाचक केली.
---- इन्फो-----
६६१ टन कचरा उचलला
प्रतिष्ठानच्या सेवकांनी शिस्तबद्धपणे राबविलेल्या या मोहीमेत दर दहा-पंधरा मिनिटांत एक ट्रॅक्टरभर कचरा उचलला जात होता. अवघ्या चार तासात शहरातील गल्ली-बोळातील सुमारे ६६१ टन कचरा उचलण्यात आला. त्यात ओला कचरा २३०.१८ टन, कोरडा कचरा ४३१.३७ टन.
---- इन्फो-----
१००हून अधिक वाहने
प्रतिष्ठानच्या सेवकांनीच ट्रॅक्टर व इतर वाहने कचरा वाहतुकीसाठी आणली होती. त्यांच्या मदतीला मनपाच्या घंटागाड्या,डंपर, जेसीबी मदतीला देण्यात आलेले होते. सेवेकरी ज्या मालवाहू रिक्षा, मेटॅडोरने शहरात आले होते. त्या रिक्षातून देखील कचर्‍याची वाहतूक करण्यात येत होती. जैन उद्योग समुहाने देखील या मोहीमेसाठी मनपाला ३ जेसीबी, ५ डंपर उपलब्ध करून दिले होते. मोहीमेत एकूण ७५ ट्रॅक्टर, ३ जेसीबी, ३० छोटी वाहने व २२ घंटागाड्या सहभागी झाल्या होत्या.

Web Title: In just 4 hours, City pauses 661 tonnes of garbage lifted: Sanasi campaign implemented by Nanasaheb Dharmadhikari Pratishthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.