न्याय व सन्मान हा आमचा घटनात्मक अधिकार - असदुद्दीन ओवैसी

By admin | Published: April 22, 2017 04:17 PM2017-04-22T16:17:01+5:302017-04-22T16:33:37+5:30

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या मुस्लिमनागरिकांचा सन्मान आणि न्यायासंबंधित केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे.

Justice and honor is our constitutional right - Asaduddin Owaisi | न्याय व सन्मान हा आमचा घटनात्मक अधिकार - असदुद्दीन ओवैसी

न्याय व सन्मान हा आमचा घटनात्मक अधिकार - असदुद्दीन ओवैसी

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या मुस्लिम
नागरिकांचा सन्मान आणि न्यायासंबंधित केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. 
 
"मुस्लिम नागरिकांची मते मिळत नसतानाही भाजपा त्यांना न्यायाने आणि सन्मानाने वागवत आहे", असे वक्तव्य रविशंकर प्रसाद यांनी केले आहे. यावर "मुस्लिमांना सन्मान आणि न्याय देणारे तुम्ही कोण?. भारतीय घटनेने आम्हाला तसा अधिकार दिला असून आमच्या हक्कांचे संरक्षण झालेच पाहिजे, हे तुमचे काम आहे. रविशंकर प्रसाद हे कायदा मंत्री असल्यामुळे या नियमांची अंमलबजावणी करणे त्यांचं काम आहे", अशी प्रतिक्रिया ओवैसी यांनी दिली आहे.
 
 
रविशंकर प्रसाद नेमके काय म्हणालेत?
मुस्लिम समाज भाजपाला मतदान करत नाही, तरिही सरकार त्यांना योग्य आदर देत आहे, असे वक्तव्य केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले होते. ते शुक्रवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. 
 
यावेळी ते म्हणाले की, ""आमचे 13 मुख्यमंत्री आहेत. आम्ही सरकार चालवत आहोत. आम्ही उद्योग किंवा सेवा क्षेत्रात काम करणा-या एखाद्या मुस्लिम नागरिकाला कधी त्रास दिला आहे? आम्ही कोणाची हकालपट्टी ? मुस्लिम नागरिक मतदान देत नाहीत, ही बाब आम्ही स्पष्टपणे स्वीकारली आहे, मात्र आम्ही त्यांना संपूर्ण सन्मान देत आहोत की नाही?"". 
 
सरकारचे सध्याचे धोरण देशातील सर्व समाजांना सामावून घेणारे आहे का?, या प्रश्न त्यांना कार्यक्रमात विचारण्यात आला होता. त्यावर  रविशंकर प्रसाद यांनी वरील उत्तर दिलं. यामुळे त्यांच्यावर सध्या चौफेर टीका होऊ लागली आहे. 
 

Web Title: Justice and honor is our constitutional right - Asaduddin Owaisi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.