न्या. दत्तू बनणार मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष
By Admin | Published: February 24, 2016 11:59 PM2016-02-24T23:59:09+5:302016-02-24T23:59:09+5:30
माजी सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांची मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. के. जी. बालकृष्णन यांच्या निवृत्तीमुळे गेल्या ८ महिन्यांपासून हे पद रिक्त होते.
नवी दिल्ली : माजी सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांची मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. के. जी. बालकृष्णन यांच्या निवृत्तीमुळे गेल्या ८ महिन्यांपासून हे पद रिक्त होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील समितीने ही निवड केली.
मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदाची त्यांची कारकीर्द पाच वर्षांसाठी असेल. न्या. दत्तू यांचे नाव राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठविले जाईल. न्या. दत्तू गेल्या वर्षी २ डिसेंबर रोजी सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले. २८ सप्टेंबर २०१४ ते २ डिसेंबर २०१५ या काळात ते देशाचे सरन्यायाधीश होते. त्यांनी १९७५ पासून वकिलीला सुरुवात केली. १९९५ मध्ये ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले. फेब्रुवारी २००७ मध्ये ते छत्तीसगढ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले होते. (वृत्तसंस्था)