न्या. एच. एल. दत्तू होणार सरन्यायाधीश

By admin | Published: September 4, 2014 12:50 AM2014-09-04T00:50:26+5:302014-09-04T00:50:26+5:30

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश न्या. एच. एल. दत्तू भारताचे पुढील सरन्यायाधीश होतील, हे बुधवारी स्पष्ट झाले.

Justice H. L. Dattu will be the Chief Justice of India | न्या. एच. एल. दत्तू होणार सरन्यायाधीश

न्या. एच. एल. दत्तू होणार सरन्यायाधीश

Next
28 सप्टेंबरला सूत्रे स्वीकारणार : पंतप्रधान कार्यालयाने दिली मंजुरी
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश न्या. एच. एल. दत्तू भारताचे पुढील सरन्यायाधीश होतील, हे बुधवारी स्पष्ट झाले.
सरन्यायाधीशपदी न्या. दत्तू  यांच्या नावास पंतप्रधान कार्यालयाने मंजुरी दिली असून आता ते राष्ट्रपतींकडे पाठविले जाईल. सरन्यायाधीश ज्येष्ठताक्रमाने नेमण्याची प्रथा असल्याने आता राष्ट्रपतींकडून अधिकृत शिक्कामोर्तब व्हायची औपचारिकता शिल्लक आहे. विद्यमान सरन्यायाधीश न्या. राजेंद्र मल लोढा येत्या 27 सप्टेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर ते ही सूत्रे स्वीकारतील. 
त्यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाल वयाला 65 वर्षे  पूर्ण होईर्पयत  म्हणजे 2 डिसेंबर 2क्15 र्पयत असेल. न्या. सरोश कापडिया यांच्यानंतर एक वर्षाहून अधिक कार्यकाळ मिळणारे ते पहिलेच सरन्यायाधीश असतील.
न्या. दत्तू  मुळचे कर्नाटकचे असून 1975 पासून 2क् वर्षे वकिली केल्यानंतर ते डिसेंबर 1995 मध्ये त्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. छत्तीसगढ व केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद सांभाळल्यानंतर डिसेंबर 2क्क्8 मध्ये न्या. दत्तू  यांची सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती झाली .(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
प्रस्तावित आयोगाचे पहिले अध्यक्ष
च्न्यायाधीशांनीच न्यायाधीशांची निवड करण्याची सध्याची ‘कॉलेजियम’ पद्धत मोडीत काढून सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या निवडीसाठी राष्ट्रीय न्यायिक नेमणुका आयोग स्थापन करण्याचे घटनादुरुस्ती विधेयक मोदी सरकारने संसदेत मंजूर करून घेतले आहे. 
 
च्किमान निम्म्या राज्यांची संमती व राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर सुमारे आठ महिन्यांत हा प्रस्तावित आयोग स्थापन होणो अपेक्षित आहे. त्यावेळी सरन्यायाधीश या नात्याने या आयोगाचे पहिले अध्यक्ष होण्याचा मानही न्या. दत्तु यांना मिळेल, असे दिसते. म्हणजेच न्यायाधीश निवडीची नवी पद्धत त्यांच्याच कारकिर्दीत सुरु होईल.

 

Web Title: Justice H. L. Dattu will be the Chief Justice of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.