न्या. कर्णन तुरुंगातून रुग्णालयात
By admin | Published: June 22, 2017 01:58 AM2017-06-22T01:58:28+5:302017-06-22T01:58:28+5:30
कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्या. सी. एस. कर्णन यांची बुधवारी येथील प्रेसिडेन्सी कारागृहात रवानगी करण्यात आली.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : न्यायालयीन अवमानाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ठोठावलेली सहा महिन्यांची शिक्षा भोगण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्या. सी. एस. कर्णन यांची बुधवारी येथील प्रेसिडेन्सी कारागृहात रवानगी करण्यात आली. मात्र छातीत दुखू लागल्याने त्यांना रात्री रुग्णालयात नेण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने कारावास ठोठावल्यापासून फरार असलेल्या कर्णन यांना मंगळवारी पोलिसांनी कोइम्बतूर येथे अटक केली. कर्णन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत जामीन मिळावा आणि शिक्षा निलंबित करावी, अशी मागणी केली. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका बुधवारी फेटाळून लावली.