न्या. जोसेफ यांची सुप्रीम कोर्टासाठी पुन्हा शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 04:43 AM2018-07-21T04:43:41+5:302018-07-21T04:43:48+5:30

‘कॉलेजियम’ने उत्तराखंडचे मुख्य न्यायाधीश न्या. के. एम. जोसेफ यांच्या नावाची सुप्रीम कोर्टात नेमणुकीसाठी पुन्हा शिफारस केली आहे.

Justice Joseph recommended again for the Supreme Court | न्या. जोसेफ यांची सुप्रीम कोर्टासाठी पुन्हा शिफारस

न्या. जोसेफ यांची सुप्रीम कोर्टासाठी पुन्हा शिफारस

googlenewsNext

नवी दिल्ली : ‘कॉलेजियम’ने उत्तराखंडचे मुख्य न्यायाधीश न्या. के. एम. जोसेफ यांच्या नावाची सुप्रीम कोर्टात नेमणुकीसाठी पुन्हा शिफारस केली आहे. ओडिशा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश न्या. वितीन शरण व मद्रास हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीश न्या. इंदिरा बॅनर्जी यांचीही सुप्रीम कोर्टात नेमणुकीसाठी शिफारस केली.
न्या. जोसेफ यांची नेमणूक हा सरकार व न्यायसंस्था यांच्यातील संघर्षाचा मुद्दा होता. ‘कॉलेजियम’ने न्या. जोसेफ यांच्या नावाची शिफारस १० जानेवारी रोजी न्या. इंदू मल्होत्रा यांच्या नावासह केली. सरकारने न्या. मल्होत्रा यांची नेमणूक केली. मात्र न्या. जोसेफ यांच्या नावास आक्षेप घेतला.आता ‘कॉलेजियमन’ने त्यांचे नाव पुन्हा एकदा सुचविल्याने, न्या. जोसेफ यांची नेमणूक करावी लागेल.
न्या. जोसेफ यांचे नाव परत पाठविताना केरळला सुप्रीम केर्टात जास्त प्रतिनिधित्व मिळेल, असे आक्षेप होते. पण उत्तराखंडमध्ये लागू केलेली राष्ट्रपती राजवट घटनाबाह्य ठरवून रद्द करण्याचा निकाल न्या. जोसेफ यांनी दिली होता, हे विरोधाचे कारण मानले गेले.
न्या. जोसेफ यांच्या नावाचा निर्णय सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर, न्या. कुरियन जोसेफ व न्या. ए. के. सिक्री यांच्या ‘कॉलेजियम’ने १६ जुलैच्या बैठकीत केली. तो निर्णय सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटवर शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला.
>प्रथमच तीन महिला न्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयात सध्या न्यायाधीशांच्या ३१ मंजूर पदांपैकी २२ न्यायाधीश आहेत व नऊ पदे रिकामी आहेत. त्यापैकी फक्त तीन पदांसाठी ‘कॉलेजियम’ने पात्र उमेदवारांच्या नावांचा विचार केला व न्या. सरन व न्या. बॅनर्जी यांची शिफारस केली. न्या. बॅनर्जी यांच्या नेमणुकीने सर्वोच्च न्यायालयात प्रथमच त्या व न्या. आर. भानुमती आणि न्या. इंदू मल्होत्रा अशा तीन महिला न्यायाधीश एकाच वेळी असणार आहेत.

Web Title: Justice Joseph recommended again for the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.