न्यायाला मानवी चेहरा असावा- सरन्यायाधीश दीपक मिश्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 07:57 PM2018-10-01T19:57:06+5:302018-10-01T19:59:46+5:30

मावळत्या सरन्यायाधीशांकडून तरुण वकिलांचं कौतुक

Justice must have human face says Outgoing CJI Dipak Misra | न्यायाला मानवी चेहरा असावा- सरन्यायाधीश दीपक मिश्रा

न्यायाला मानवी चेहरा असावा- सरन्यायाधीश दीपक मिश्रा

googlenewsNext

नवी दिल्ली: लोकांचा भूतकाळ पाहून मी त्यांची पारख करत नाही. त्याऐवजी मी त्यांची कृती आणि दृष्टीकोन लक्षात घेतो. त्यातूनच मी त्यांना पारखतो, असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी म्हटलं आहे. सरन्यायाधीश म्हणून आपल्या अखेरच्या भाषणात मिश्रा यांनी न्यायव्यवस्थेशी संबंधित अनेक मुद्यांवर भाष्य केलं. भारतीय न्यायव्यवस्था जगातील एक भक्कम न्यायव्यवस्था असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. 

न्यायाला मानवी चेहरा असायला हवा, असं दीपक मिश्रा यांनी भाषणात म्हटलं. 'मी बार असोसिएशनबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या कारकिर्दीबद्दल मी पूर्णपणे संतुष्ट आहे. आपली न्यायव्यवस्था जगातील सर्वात भक्कम न्यायव्यवस्थांपैकी एक असून यात न्यायाधीशांची भूमिका महत्त्वाची आहे,' असं मावळत्या सरन्यायाधीशांनी म्हटलं. यावेळी त्यांनी तरुण वकिलांची मुक्तकंठानं स्तुती केली. तरुण वकिलांकडे अफाट क्षमता असल्याचं ते म्हणाले. 




सरन्यायाधीश दीपक मिश्रा उद्या निवृत्त होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी न्यायाधीश आणि वकिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समाजावरही भाष्य केलं. 'समाज हा प्रत्येक लहान मुलासाठी आईसारखा असतो. श्रीमंत आणि गरिबांचे अश्रू सारखेच असतात,' असं मिश्रा म्हणाले. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींचाही उल्लेख केला. न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी दीपक मिश्रा यांच्या दूरदर्शीपणाचं कौतुक केलं. दीपक मिश्रा हे एक असाधारण न्यायाधीश आहेत. नागरिकांचं स्वातंत्र्य जपण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली, असं गोगोई म्हणाले. यापुढे रंजन गोगोई यांच्याकडे सरन्यायाधीशपदाची जबाबदारी असणार आहे. 



 

Web Title: Justice must have human face says Outgoing CJI Dipak Misra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.