ईशान्य भारताला 'सर्वोच्च न्याय'... जाणून घ्या देशाचे नवे सरन्यायाधीश रंजन गोगोईंबद्दल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 10:18 AM2018-10-03T10:18:50+5:302018-10-03T11:01:38+5:30

न्या. रंजन गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

justice ranjan gogoi appointed new chief justice of india | ईशान्य भारताला 'सर्वोच्च न्याय'... जाणून घ्या देशाचे नवे सरन्यायाधीश रंजन गोगोईंबद्दल!

ईशान्य भारताला 'सर्वोच्च न्याय'... जाणून घ्या देशाचे नवे सरन्यायाधीश रंजन गोगोईंबद्दल!

Next

नवी दिल्ली : न्या. रंजन गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोगोईंच्या नियुक्तीची घोषणा केली. आज 3 ऑक्टोबर रोजी गोगोई यांनी 46 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे. बुधवारी सकाळी 10.45 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये शपथ विधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे.



सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा 2 ऑक्टोबर रोजी निवृत्त झाले आहेत. त्यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून गोगोईंचं नाव केंद्र सरकारला पाठवलं होतं. त्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केलं होतं. गोगोई यांनी आजपासून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाचा पदभार स्विकारला आहे. 



कोण आहेत न्या. रंजन गोगोई?

रंजन गोगोईं यांच्या निमित्ताने प्रथमच ईशान्य भारतातील व्यक्ती सरन्यायाधीशपदी नियुक्त होत आहे. 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत गोगोई सरन्यायाधीशपदी कार्यरत राहणार आहेत. न्या. रंजन गोगोई यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1954 रोजी आसाममध्ये झाला. 28 फेब्रुवारी 2001 रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश बनले होते. त्यानंतर 12 फेब्रुवारी 2011 रोजी ते पंजाब-हरयाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश बनले. 23 एप्रिल 2012 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाची जबाबदारी स्वीकारली. 

न्या. रंजन गोगोईं यांच्यासमोर 'ही' आहेत आव्हानं

सरन्यायाधीशपदी नियुक्त झाल्यानंतर रंजन गोगोई यांच्यासमोर अनेक आव्हानं असणार आहेत. अयोध्या प्रकरणावर सुनावणी हे गोगोई यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. तसेच प्रलंबित खटले निकाली काढण्याची महत्वाची कामं आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच गेल्या वर्षी ज्या चार न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतले होते त्यामध्ये गोगोई यांचाही समावेश होता. 

Web Title: justice ranjan gogoi appointed new chief justice of india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.