सरन्यायाधीशांविरोधातील षडयंत्राच्या दाव्याची माजी न्यायमूर्तींच्या समितीकडून होणार चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 02:45 PM2019-04-25T14:45:24+5:302019-04-25T14:46:51+5:30

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात रचण्यात आलेल्या षडयंत्राचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कठोर पावले उचलली आहेत.

Justice Retired AK Patnaik has been appointed to head the inquiry to probe Utsav Bains' allegations | सरन्यायाधीशांविरोधातील षडयंत्राच्या दाव्याची माजी न्यायमूर्तींच्या समितीकडून होणार चौकशी 

सरन्यायाधीशांविरोधातील षडयंत्राच्या दाव्याची माजी न्यायमूर्तींच्या समितीकडून होणार चौकशी 

googlenewsNext

नवी दिल्ली - सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात रचण्यात आलेल्या षडयंत्राचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कठोर पावले उचलली असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती ए.के. पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. देशाच्या सरन्यायाधीशांवरच लैंगिक शोषणाचे आरोप झाल्याने न्यायव्यवस्थेसह देशभरात खळबळ उडाली आहे.
 
मात्र सरन्यायाधीशांविरोधात करण्यात आलेले लैंगिक शोषणाचे आरोप हे एका कारस्थानाचा भाग असल्याचा दावा अॅड. उत्सव सिंह बैंस यांनी केला होता. तसेच या संदर्भात त्यांनी काही कागदपत्रेही सादर केली होती. त्यानंतर ही कागदपत्रे तसेच सीसीटीव्ही फूटेज न्यायालयाने ताब्यात घेऊन सील केले होते. आता या संदर्भात निवृत्त न्यायमूर्ती ए.के. पटनाईक हे चौकशी करतील. तसेच सीबीआयचे संचालक आणि आयबीचे संचालक त्यांना तपासकार्यामध्ये सहकार्य करतील असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले की, खंडपीठांवरील न्यायाधीशांना ‘खिशात’ घालून त्यांच्याकडून हवे तसे निकाल मिळवून देण्याचा दावा करणाºया काही ‘फिक्सर’ची नावेही अ‍ॅड. बैन्स यांनी दिली आहेत व अशा लोकांशी भेटीगाठी झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. न्यायसंस्थेत अशा ‘फिक्सर’ना स्थान नसल्याने, याच्या मुळात शिरून शहानिशा करणे गरजेचे आहे.

Web Title: Justice Retired AK Patnaik has been appointed to head the inquiry to probe Utsav Bains' allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.