अन्याय किती सहन करणार सादरेेंच्या कुटुंबीयांना न्याय द्या : नागरिकांमध्ये जनजागृती
By admin | Published: October 28, 2015 12:05 AM2015-10-28T00:05:14+5:302015-10-28T00:05:14+5:30
जळगाव- जिल्ातील अधिकारी असुरक्षित आहेत. एका पोलीस अधिकार्याला राजकारण्यांच्या जाचामुळे कंटाळून आत्महत्या केली. तर आता सर्वसामान्यांचे काय होणार. पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, पण त्यांना न्याय मिळत नाही... किती दिवस हा अन्याय सहन करणार असे विविध मुद्दे उपस्थित करीत सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, दीपककुमार गुप्ता, अर्जुन भोई, अनिल नाटेकर यांनी शहरात महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरू यांची वेशभूषा साकारून शहरात ठिकठिकाणी जनजागृती केली.
Next
ज गाव- जिल्ातील अधिकारी असुरक्षित आहेत. एका पोलीस अधिकार्याला राजकारण्यांच्या जाचामुळे कंटाळून आत्महत्या केली. तर आता सर्वसामान्यांचे काय होणार. पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, पण त्यांना न्याय मिळत नाही... किती दिवस हा अन्याय सहन करणार असे विविध मुद्दे उपस्थित करीत सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, दीपककुमार गुप्ता, अर्जुन भोई, अनिल नाटेकर यांनी शहरात महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरू यांची वेशभूषा साकारून शहरात ठिकठिकाणी जनजागृती केली. मंगळवारी सकाळी हा जनजागृतीचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला. महापालिकेसमोरचा परिसर, टॉवर चौक, नेहरू चौक, कोर्ट चौक, जुने बसस्थानक परिसरात गुप्ता व पाटील यांनी जनजागृती केली. पालकच दखल घेत नाही...ज्याच्यावर सात गुन्हे दाखल आहेत त्याच्या तक्रारींची दखल पोलीस घेतात. पण आता सादरे यांच्या पत्नीने आरोपींवर कारवाईची मागणी केली तर त्याची दखल कुणी घेत नाही. पालकच न्याय देत नाही... आता न्याय मागायचा कुणाकडे, असा प्रश्न पाटील यांनी जागोजागी केलेल्या नाटीकेद्वारे केला. आपणालाच ही लढाई लढावी लागेलदेशाला स्वातंत्र्य मिळाले, परंतु जनता अन्याय सहन करीतच आहे. पुन्हा गांधींना जन्म घ्यावा लागेल, असे म्हणतात. पण नागरिकांनो आपणच गांधी बना, आपणच आपला न्याय मिळवा, गांधी पुन्हा येणार नाही. आपल्यालाच ही लढाई लढावी लागेल, असे आवाहन पाटील व गुप्ता यांनी ठिकठिकाणी केले. भ्रष्ट अधिकारी नकोतजिल्ात भ्रष्ट अधिकारी आहेत. त्यांच्यामुळे विकास रखडला आहे. भ्रष्ट अधिकारी दूर करायला हवेत. प्रामाणिक अधिकार्यांची नियुक्ती विविध शासकीय संस्थांवर करायला हवी, असेही पाटील या जनजागृती कार्यक्रमादरम्यान म्हणाले.