अंबानींकडून एका दिवसासाठी एवढी 'तगडी' रक्कम वसूल करतोय जस्टिन बिबर, रिहानाही पडली मागे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 22:31 IST2024-07-04T22:30:17+5:302024-07-04T22:31:21+5:30
Anant Radhika Sangeet: लेटेस्ट अपडेटनुसार, हा संगीत सेरेमनी कार्यक्रम लाइफ टाइम मेमोरेबल बनवण्यासाठी टॉप इंटरनॅशनल पॉप सिंगर भारतातही आला आहे. हा सिंगर आहे, जस्टिन बिबर. माध्यमांतील वृत्तांनुसार या

अंबानींकडून एका दिवसासाठी एवढी 'तगडी' रक्कम वसूल करतोय जस्टिन बिबर, रिहानाही पडली मागे!
अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट यांच्या विवाहादरम्यान होणाऱ्या कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी अंबानी कुटुंबीय सढळ हाताने पैसा खर्च करत आहे. दोन जबरदस्त प्री-वेडिंग फंक्शननंतर, आता लग्नादरम्यानचा 'मामेरू विधी'सह 5 जुलैचा संगीत सेरेमनी कार्यक्रम ग्रँड असणार आहे. लेटेस्ट अपडेटनुसार, हा संगीत सेरेमनी कार्यक्रम लाइफ टाइम मेमोरेबल बनवण्यासाठी टॉप इंटरनॅशनल पॉप सिंगर भारतातही आला आहे. हा सिंगर आहे, जस्टिन बिबर. माध्यमांतील वृत्तांनुसार या कार्यक्रमासाठी जस्टिन बिबरने रिहानापेक्षाही अधिक रक्कम चार्ज केली आहे.
गुरुवारीच पोहोचला मुंबईत -
जस्टिन बिबर गुरुवारी सकाळी (4 जुलै) मुंबईत पोहोचला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, तो येथे केवळ अनंत-राधिका यांच्या संगीत सेरेमनीमध्ये परफॉर्म करण्यासाठी आला आहे. तो 5 जुलैला अनंत-राधिका यांच्या संगीत सेरेमनीमध्ये धमाकेदार परफॉर्मेंस करेल. संगीत सेरेमनीचा हा कार्यक्रम नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या घरी अर्थात 'अँटीलिया'मध्ये होईल.
जस्टिन बिबरची फीज जाणून थक्क व्हाल -
'द फ्री प्रेस जर्नल'च्या वृत्तानुसार, या विवाह कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी जस्टिन जवळपास 10 मिलियन डॉलर, भारतीय चलनाचा विचार करता, जवळफास 83 कोटी रुपये घेत आहे. जस्टिन बिबर शिवाय इतरही काही परदेशी सिंगर देखील लग्न आणि संबंधित कार्यक्रमांत परफॉर्म करण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अडेल, ड्रेक आणि लाना डेल रेल याच्यासोबत बोलणी सुरू आहे.
रिहानापेक्षाही अधिक फीस घेतोय जस्टिन बिबर-
जामनगरमध्ये झालेल्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये परदेशी सिंगर रिहाना आली होती. यावेळी परफॉर्मसाठी तिने जवळपास 74 कोटी रुपये घेतले होते. महत्वाचे म्हणजे, 5 जुलैला संगित सेरेमनी, यानंतर, 12 जुलैला लग्न, 13 जुलैला आशीर्वाद सेरेमनी आणि 14 जुलैला ग्रँड वेडिंग रिसेप्शन ठवण्यात आले आहे.