झाविमोचे सहा आमदार भाजपात

By admin | Published: February 11, 2015 11:19 PM2015-02-11T23:19:48+5:302015-02-11T23:19:48+5:30

नवी दिल्ली- झारखंड विकास मोर्चाच्या (प्रजातांत्रिक)सहा आमदारांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राज्य विधानसभेत आम्हाला सत्ताधारी आघाडीच्या सदस्यांसोबत बसण्याची परवानगी दिली जावी, अशी विनंती त्यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्षांना केली होती.

JVM's six MLAs | झाविमोचे सहा आमदार भाजपात

झाविमोचे सहा आमदार भाजपात

Next
ी दिल्ली- झारखंड विकास मोर्चाच्या (प्रजातांत्रिक)सहा आमदारांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राज्य विधानसभेत आम्हाला सत्ताधारी आघाडीच्या सदस्यांसोबत बसण्याची परवानगी दिली जावी, अशी विनंती त्यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्षांना केली होती.
नवीन जयस्वाल (हतिया), अमरकुमार बौरी (चंदनकियारी), गणेश गंजू (सिमेरिया), आलोककुमार चौरसिया (डाल्टनगंज), रणजीतसिंग (सारथ) आणि जानकी यादव (बरखटा)यांनी नवी दिल्लीतील झारखंड भवनात राज्याचे मुख्यमंत्री रघुवर दास आणि भाजपाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश घेतल्याची माहिती प्रदेश भाजपाचे प्रवक्ते प्रदीप सिन्हा यांनी दिली.
सध्या ८१ सदस्यीय झारखंड विधानसभेत भाजपाची सदस्य संख्या ३७ असून सुदेश महतो यांच्या आजसूच्या मदतीने त्यांनी राज्यात सरकार स्थापन केले आहे. आता सत्ताधारी भाजप आघाडीची सदस्य संख्या ४८ झाली आहे.
भाजपा इतर पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न का करीत आहे? असा प्रश्न विचारला असता आमचा तोडण्यावर नाही तर जोडण्यावर विश्वास असल्याचे दास यांनी सांगितले. राज्याच्या विकासासाठी भाजपा सरकारला सहकार्य करण्यास इच्छु्रक असलेल्यांचे पक्षात स्वागत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष व राज्याचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी भाजपावर झाविमो आणि काँग्रेस पक्षाचे आमदार पळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. मरांडी यांनी जयस्वाल, बौरी आणि चौरसिया या तिघांना पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून पक्षातून निलंबित केले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: JVM's six MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.