ज्योतिरादित्य सिंधियांनी ट्विटरवरून 'भाजपा' हटविले?, चर्चांना उधाण!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 09:36 AM2020-06-06T09:36:47+5:302020-06-06T09:50:18+5:30

ज्योतिरादित्य सिंधियांनी काँग्रेस सोडण्यापूर्वी पक्षाचे नाव आपल्या ट्विटरच्या प्रोफाइलमधून काढून टाकले होते.

Jyotiraditya Scindia deleted 'BJP' from Twitter ?, discussions abound! | ज्योतिरादित्य सिंधियांनी ट्विटरवरून 'भाजपा' हटविले?, चर्चांना उधाण!

ज्योतिरादित्य सिंधियांनी ट्विटरवरून 'भाजपा' हटविले?, चर्चांना उधाण!

Next
ठळक मुद्देज्योतिरादित्य सिंधिया हे गेली १८ वर्षे काँग्रेसमध्ये होते. ज्योतिरादित्य सिंधियांनी काँग्रेस सोडण्यापूर्वी पक्षाचे नाव आपल्या ट्विटरच्या प्रोफाइलमधून काढून टाकले होते.

भोपाळ : भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून कथितरित्या 'भाजपा' हटविल्याचे म्हटले जात आहे. 'भाजपा' त्याऐवजी त्यांनी जनतेचा सेवक आणि क्रिकेटप्रेमी असे लिहिले आहेत. यानंतर चर्चेला उधाण आले आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 'भाजपा' त्यांच्या ट्विटर प्रोफाइलमध्ये जोडले नाही. मात्र, याबाबत भाजपा किंवा ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

ज्योतिरादित्य सिंधिया हे गेली १८ वर्षे काँग्रेसमध्ये होते. मात्र, होळीच्या दिवशी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांच्या समर्थकांना शिवराज मंत्रिमंडळात समावेश आणि केंद्रात त्यांना कॅबिनेट मंत्री बनविण्याची चर्चा होती. परंतु आता असे वृत्त येत आहे की, त्यांच्या समर्थक माजी आमदारांना पोटनिवडणुकीसाठी तिकीट मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या मंत्रिमंडळावरून काही संभाव्य तारखा अनौपचारिकरित्या जाहीर केल्या आहेत. राज्यातील पक्ष नेतृत्वासह मुख्यमंत्र्यांनी संभाव्य मंत्र्यांची यादी तयार केली, ती माध्यमांतून लीक झाली. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नाही. याचबरोबर, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात जोतिरादित्य सिंधिया यांचा समावेश करण्यात येणार असल्याची चर्चा आता कमी झाली आहे. दरम्यान, ग्वाल्हेर-चंबळ विभागात त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या भाजपा प्रवेशास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले होते.

भाजपाने पोटनिवडणुकीत ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या २२ समर्थक आमदारांना तिकिट देण्याचा दावा केला आहे. मात्र, आता या समर्थक आमदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनके जागांवर भाजपाला आपल्या जुन्या नेत्यांमध्ये बंडखोरी दिसून येत आहे. हातपीपल्यातील दीपक जोशी असो किंवा ग्वाल्हेरमध्ये यापूर्वी काँग्रेसमध्ये सामील झालेले बेलेंदु शुक्ला असोत. भाजपाला आपल्या नेत्यांना पटवून देणे अवघड जात असल्याचे बोलले जात आहे. तसेच, ज्योतिरादित्य सिंधिया समर्थक माजी आमदारांच्या काही जागांवर विजय मिळविण्यावरही शंका उपस्थित होत आहे.

दरम्यान, ट्विटरच्या प्रोफाइलवरून 'भाजपा' हटविण्याचा दावा खरा ठरल्यास ज्योतिरादित्य सिंधिया यांचा हा राजकीय दबाव मानला जाऊ शकतो. कारण त्यांनी काँग्रेस सोडण्यापूर्वी पक्षाचे नाव आपल्या ट्विटरच्या प्रोफाइलमधून काढून टाकले होते.

आणखी बातम्या...

Ladakh Standoff: भारत-चीनमधील 'हा' वाद मिटणार का? आज लष्करी अधिकाऱ्यांची बैठक

मुंबई, ठाण्यासह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात, सखल भागांमध्ये पाणी साचले

Read in English

Web Title: Jyotiraditya Scindia deleted 'BJP' from Twitter ?, discussions abound!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.