ज्योतिर्लिंग विद्यामंदिरच्या स्काऊट गाईडचा राष्ट्रीय जांबोरीत सहभाग

By admin | Published: January 23, 2017 08:12 PM2017-01-23T20:12:52+5:302017-01-23T20:12:52+5:30

वडणगे : वडणगे-निगवे (ता. करवीर) येथील ज्योतिर्लिंग विद्यामंदिरच्या स्काऊट व गाईडस् यांनी म्हैसूर येथे झालेल्या राष्ट्रीय जांबोरीमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते जांबोरीचे उद्घाटन झाले.

Jyotirlinga Vidyalandir's Scout guide participates in National Zambori | ज्योतिर्लिंग विद्यामंदिरच्या स्काऊट गाईडचा राष्ट्रीय जांबोरीत सहभाग

ज्योतिर्लिंग विद्यामंदिरच्या स्काऊट गाईडचा राष्ट्रीय जांबोरीत सहभाग

Next
णगे : वडणगे-निगवे (ता. करवीर) येथील ज्योतिर्लिंग विद्यामंदिरच्या स्काऊट व गाईडस् यांनी म्हैसूर येथे झालेल्या राष्ट्रीय जांबोरीमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते जांबोरीचे उद्घाटन झाले.
म्हैसूर येथे १७ वी राष्ट्रीय जांबोरी उत्साहात झाली. यात देशातील २५ हजार स्काऊट व गाईडस् सहभागी झाले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातून ज्योतिर्लिंग विद्यालयाच्या नववीतील गाईडस् धनश्री जगताप, रेणू ढिसाळ, अर्जिता चौगले, श्रद्धा एकशिंगे, साक्षी चौगले, प्रीती चौगले, वृषाली नावले, प्राची चव्हाण, गाईड कॅप्टन पुष्पा राजमाने सहभागी झालेल्या होत्या. या गाईडस्नी ॲडव्हेंचर व्हॅली अँड ॲडव्हेंचर पार्क, ग्लोबल व्हिलेज, वर्ल्ड व्हिलेज, ग्रुप ॲक्टिव्हिटी, रांगोळी, शोभायात्रा, लाठीकाठी, लेझीम, महाराष्ट्र डे, फन गेम्स, बॅग्ज प्रोग्रॅम, एकात्मता खेळ यामध्ये उत्कृष्ट सादरीकरण केले.
-----

फोटो -
करवीर तालुक्यातील वडणगे-निगवे येथील श्री ज्योतिर्लिंग विद्यामंदिरचे स्काऊट व गाईडस् म्हैसूर येथे झालेल्या राष्ट्रीय जांबोरीमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत डॉ. व्ही. जी. कुलकर्णी, पुष्पा राजमाने, श्रीराम साळुंखे, आदी उपस्थित होते.

Web Title: Jyotirlinga Vidyalandir's Scout guide participates in National Zambori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.