भारतीय लष्कराचे सामर्थ्य वाढणार!; दोन अत्याधुनिक तोफांचा सैन्यदलात समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 10:28 AM2018-11-09T10:28:50+5:302018-11-09T15:25:15+5:30

देशाच्या सीमारेषेवरील वाढती आव्हानं पाहता भारतीय लष्कराकडून आपले सामर्थ्य वाढवलं जात आहे.

K9 Vajra, M777 howitzers to be inducted on Friday, Nirmala Sitharaman to attend event | भारतीय लष्कराचे सामर्थ्य वाढणार!; दोन अत्याधुनिक तोफांचा सैन्यदलात समावेश

भारतीय लष्कराचे सामर्थ्य वाढणार!; दोन अत्याधुनिक तोफांचा सैन्यदलात समावेश

ठळक मुद्देदोन अत्याधुनिक तोफांचा भारतीय लष्करात समावेशके.9 वज्रची 38 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता एम 777 अल्ट्रालाईट होवित्झर तोफ सैन्यदलात

नवी दिल्ली - देशाच्या सीमारेषेवरील वाढती आव्हानं पाहता भारतीय लष्कराकडून आपले सामर्थ्य वाढवलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर, भारतीय सैन्याला शत्रू देशांच्या नाकीनऊ आणण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यात येणार आहे. नाशिकमधील भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्र देवळाली येथे एम 777 अल्ट्रालाईट होवित्झर आणि के.9 वज्र या दोन नव्या अत्याधुनिक परदेशी बनावटीच्या तोफा भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात तोफखाना केंद्रात ही शस्त्रास्त्र लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. या सोहळ्यासाठी देवळाली तोफखाना केंद्रात लष्करी थाटात जय्यत तयारी करण्यात आली.  शिवाय, परिसरात चोख सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली होती.   





निर्मला सितारामन यांचे भाषणातील मुद्दे

- भारतीय संरक्षण खाते जलदरित्या आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे 

- तीस वर्षानंतर भारतीय सेनेत दोन नव्या अत्याधुनिक तोफा दाखल झाल्या आहेत

लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांची माहिती

- पुढील वर्षात भारतीय सैन्यात 'धनुष्य' आधुनिक तोफ दाखल होणार आहे

- 'डीआरडीओ' अंतर्गत नवीन दोन तोफा देशात तयार केल्या जाणार आहेत



संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, के.9 वज्रावर 4,366 कोटी रुपयांचा खर्च होणार असून, याचे कार्य नोव्हेंबर 2020 पर्यंत पूर्ण होणार आहे. 100 तोफांपैकी सुरुवातीस 10 तोफा सैन्यदलास सोपवण्यात येणार आहेत. यानंतर 40 तोफा नोव्हेंबर 2019 आणि उर्वरित 50 तोफांचा नोव्हेंबर 2020मध्ये समावेश करण्यात येईल.  के.9 वज्र ही तोफेची 28 ते 38 किलोमीटर क्षेत्रापर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. 30 सेकंदामध्ये तीन तोफगोळे आणि तीन मिनिटांमध्ये 15 तोफगोळ्यांचा मारा करू शकते. दिवसासहीत रात्रीच्या वेळेसही अचूक लक्ष्यभेद करण्याचे या तोफेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.    

संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2019 पासून भारतीय लष्कराला या तोफांची पूर्तता करण्यात येणार आहे. 24 महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.  के.9 वज्र या तोफेव्यतिरिक्त एम 777 अल्ट्रालाईट होवित्झर तोफेचाही सैन्यदलात समावेश होणार आहे. या प्रकल्पाची किमती 5000 कोटी रुपये एवढी आहे. 2021 पर्यंत एकूण 145  एम 777 अल्ट्रालाईट होवित्झर तोफा सैन्यदलाकडे सोपवण्यात येतील. या अत्याधुनिक तोफेचं वजन केवळ 4.2 टन एवढे आहे. 



 

Web Title: K9 Vajra, M777 howitzers to be inducted on Friday, Nirmala Sitharaman to attend event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.