टार्गेट पूर्ण केले म्हणून मालक आनंदित झाला, इतका की स्टाफला नव्या कोऱ्या गाड्यांच्या चाव्या वाटत सुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 18:57 IST2025-04-01T18:57:47+5:302025-04-01T18:57:59+5:30
दिवाळीला बोनस म्हणून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना करोडो रुपयांच्या कार वाटणारे सावजी ढोलकिया तुम्हाला सर्वांनाच माहिती आहेत. आता त्यांचा आदर्श ...

टार्गेट पूर्ण केले म्हणून मालक आनंदित झाला, इतका की स्टाफला नव्या कोऱ्या गाड्यांच्या चाव्या वाटत सुटला
दिवाळीला बोनस म्हणून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना करोडो रुपयांच्या कार वाटणारे सावजी ढोलकिया तुम्हाला सर्वांनाच माहिती आहेत. आता त्यांचा आदर्श घेऊन इतरही अनेक ढोलकिया तयार होत आहेत. गुजरातच्याच खेडा जिल्ह्यातील एका ज्वेलर कंपनीच्या मालकाने टार्गेट पूर्ण झाले म्हणून आनंदीत होत कर्मचाऱ्यांना नव्या कोऱ्या कार वाटल्या आहेत.
२००६ मध्ये दोन भावांनी अवघ्या विशीच्या वयात काबर ज्वेल्सची सुरुवात केली होती. पहिल्या वर्षी दोन कोटी रुपयांचा धंदा झाला होता. तेव्हा त्यांच्या कंपनीत १२ कर्मचारी होते. जेव्हा आपली कंपनी वर्षाला २०० कोटींचा बिझनेस पार करेल तेव्हा कर्मचाऱ्यांसोबत एक मोठे सेलिब्रेशन करण्याचे या दोन भावांनी ठरविले होते. अखेर सरत्या आर्थिक वर्षात ही वेळ आली. काबरा बंधुंनी सोडलेला संकल्प त्यांनी पूर्ण केला.
सध्याच्या घडीला के के ज्वेल्समध्ये १४० कर्मचारी काम करतात. या टीमशिवाय हे टार्गेट पूर्ण करणे शक्य नव्हते. सुरुवातीच्या काळापासून जे कर्मचारी कंपनीसाठी काम करत होते, त्यांना काहीतरी देणे लागत होते. मी मला आणि भावाला एखादी लक्झरी कार घेऊ शकलो असतो. परंतू, सर्वात वरिष्ठ असलेल्या १२ कर्मचाऱ्यांना मी कार गिफ्ट केल्या असल्याचे मालकाने सांगितले.
तीन महिन्यांपूर्वीच या कंपनीचा आयपीओ आला आहे. कैलास काबरा यांनी आपल्या सर्वात जुन्या कर्मचाऱ्यांना महिंद्रा एक्सयुव्ही ७००, टोयोटा ईनोव्हा, हुंदाई आय१०, एक्स्टर, मारुती अर्टिगा, ब्रेझा या कार दिल्या आहेत. हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे ते म्हणाले. सध्या या कंपनीचे अहमदाबादमध्ये सात शोरुम आहेत. तसेच विविध शहरांत विस्ताराची योजना आहे.