कैलास विजयवर्गीय यांच्या आमदार पुत्राला अटक; पालिका अधिकाऱ्याला केली बॅटने मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 05:33 PM2019-06-26T17:33:08+5:302019-06-26T17:33:48+5:30
मोठ्या फौजफाट्यासह पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले आहे.
इंदूर : जुन्या जीर्ण झालेल्या घराला पाडण्यासाठी आलेल्या इंदूर पालिकेच्या अधिकाऱ्याला भाजपाचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी चक्क बॅटने मारहाण केली. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून मोठ्या फौजफाट्यासह पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले आहे.
इंदूर परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्यामुळे, या परिसरातील जुन्या जिर्ण झालेल्या घराला पाडण्यासाठी आलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना आकाश विजयवर्गीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली. यादरम्यान स्वतः आकाश हे अधिकाऱ्याला बॅटने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. आकाश इंदूर- ३ मतदारसंघातून आमदार आहेत.
#WATCH BJP MLA Akash Vijayvargiya (son of senior BJP leader Kailash Vijayvargiya) being taken to court, after he was arrested for thrashing a Municipal Corporation employee in #Indore. #MadhyaPradeshpic.twitter.com/RxWsHGDPrN
— ANI (@ANI) June 26, 2019
या प्रकरणी आमदारासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Madhya Pradesh: Case registered against BJP MLA Akash Vijayvargiya and 10 others for thrashing a Municipal Corporation officer in Indore. Akash is the son of senior BJP leader Kailash Vijayvargiya. (File pic) pic.twitter.com/KbjTIx6uRL
— ANI (@ANI) June 26, 2019
प्रकरण काय?
जुन्या जिर्ण झालेल्या घरांना तोडण्यासाठी अधिकारी आल्यावर स्थानिकांनी आकाश यांना बोलावले. त्यानंतर अधिकारी आणि आकाश यांच्यात घर पाडण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. त्यानंतर आकाश यांच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीची चावी काढून घेतली. तुम्हाला १० मिनटांचा वेळ देतो येथून निघून जा नाहीतर जे होईल त्याची जबाबदारी तुमची असेल, अशी धमकी आकाश यांनी अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर आकाश यांनी बॅटने अधिकाऱ्यांना मारणे सुरू केले. यावेळी पोलिस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कसे-बसे अधिकाऱ्याला तेथून बाहेर काढले.