एसएमटीची सेवा बंद करणार काळम-पाटील संतापले: लक्ष्मीशी प्रतारणा करणारे काय कामाचे

By Admin | Published: September 2, 2015 11:31 PM2015-09-02T23:31:43+5:302015-09-02T23:31:43+5:30

सोलापूर: सहावा वेतन आयोग व इतर मागण्यांसाठी एसएमटीच्या (महापालिका परिवहन) कर्मचार्‍यांनी बेमुदत संप पुकारला आहे. बुधवारी संप यशस्वी करण्यासाठी बसची चाके काढून प्रवेशद्वारावर आडव्या लावल्या व पर्यायी व्यवस्थेसाठी असलेल्या एसटी बसवर दगडफेक केली. ज्याच्यावर पोट आहे अशा लक्ष्मीशी प्रतारणा करणार्‍या एसएमटी कर्मचार्‍यांची गुंडागर्दी खपवून घेणार नाही. एसएमटी बंद करण्याचा इशारा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिला.

Kalam-Patil furiously shutting down SMT's services: What works against Laxmi? | एसएमटीची सेवा बंद करणार काळम-पाटील संतापले: लक्ष्मीशी प्रतारणा करणारे काय कामाचे

एसएमटीची सेवा बंद करणार काळम-पाटील संतापले: लक्ष्मीशी प्रतारणा करणारे काय कामाचे

googlenewsNext
लापूर: सहावा वेतन आयोग व इतर मागण्यांसाठी एसएमटीच्या (महापालिका परिवहन) कर्मचार्‍यांनी बेमुदत संप पुकारला आहे. बुधवारी संप यशस्वी करण्यासाठी बसची चाके काढून प्रवेशद्वारावर आडव्या लावल्या व पर्यायी व्यवस्थेसाठी असलेल्या एसटी बसवर दगडफेक केली. ज्याच्यावर पोट आहे अशा लक्ष्मीशी प्रतारणा करणार्‍या एसएमटी कर्मचार्‍यांची गुंडागर्दी खपवून घेणार नाही. एसएमटी बंद करण्याचा इशारा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिला.
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरुद्ध बुधवारी देशभर बंद पाळण्यात आला. याबरोबरच एसएमटीमधील लालबावटा कामगार युनियनने बेमुदत बंदची घोषणा केली आहे. युनियनच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी मंगळवारी सायंकाळपासूनच सातरस्ता बसडेपोजवळ यंत्रणा राबविली. मुक्कामी गाड्या न गेल्याने व बुधवारच्या बंदमध्ये रिक्षांचा सहभाग असल्याने रात्रीतून राज्य परिवहनच्या मदतीने एसटी बसची मदत घेण्यात आल्याची माहिती आयुक्त काळम-पाटील यांनी दिली. परिवहन व्यवस्थापक खोबरे यांनी विभाग नियंत्रक जोशी यांच्याशी संपर्क साधून दहा गाड्यांचे नियोजन केले. होटगी, वळसंग, मंद्रुप, मार्डी मार्गावर जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले. या मार्गावरील गाड्या बसस्टॉपला थांबत गेल्या. पण शाळकरी मुलांचे हाल झाले.
एसटीवर दगडफेक
सातरस्ता बसडेपोसमोरून जाणार्‍या एसटीवर संपात सहभागी झालेल्या एसएमटीच्या कर्मचार्‍यांनीच दगडफेक केली. यामुळे या मार्गावरील एसटी वाहतूक बंद करण्यात आली. संबंधित परिवहन कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल करा असे आदेश आयुक्त काळम-पाटील यांनी परिवहन व्यवस्थापक खोबरे यांना दिले. एसएमटीचे नुकसान जे कर्मचारी करतील त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करा. अशा कर्मचार्‍यांशी मी चर्चा करणार नाही असे त्यांनी निक्षून सांगितले.
गुरुवारी धावणार एसटी बस
एसएमटीचे कर्मचारी बेमुदत संपावर असल्याने गुरुवारी शहरातील प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीची मदत घेण्यात आली आहे. तसेच परिवहन कर्मचार्‍यांचा संप बेकायदेशीर ठरविण्यासाठी पुणे औद्योगिक न्यायालयात धाव घेतली असून 8 सप्टेंबरला सुनावणी आहे.
आरटीओंनी राबविली यंत्रणा
बस, रिक्षा संपात सहभागी झाल्याने स्टेशनवर येणार्‍या प्रवाशांना घरी पोहोचविण्यासाठी आरटीओ कार्यालयाने स्वतंत्र यंत्रणा राबविली. खासगी 10 बसद्वारे सोरेगाव, साखर कारखाना, विडी घरकुल, पुणेनाका, बाळे अशी सेवा देण्यात आली. सिद्धेश्वर, मुंबई एक्सप्रेस, उद्यान, इंद्रायणी एक्स्प्रेसमधून आलेल्या प्रवाशांना ही सेवा मिळाली. अकरा वाजेनंतर काही रिक्षा सुरू झाल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली नाही. शाळकरी मुलांना आणण्यासाठी पालकांनी दुचाकी वाहनांचा वापर केला.
000जोड आहे...

Web Title: Kalam-Patil furiously shutting down SMT's services: What works against Laxmi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.