नैसर्गिक सौंदर्य लाभलेले ‘कोळे’ गाव

By admin | Published: February 20, 2016 02:01 AM2016-02-20T02:01:23+5:302016-02-20T02:01:23+5:30

डोंगरकड्या कपार्‍याच्या पायथ्याशी वसलेले आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेले गाव म्हणून ‘कोळे’ गावाची ओळख सांगता येईल. पर्यटनाच्या दृष्टीने शासनस्तरावरुन पाठपुरावा झाल्यास कोळे गावाचा आमूलाग्र बदल होऊन वेगळी ओळख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास सरपंच अर्चना हातेकर यांनी व्यक्त केला.

The 'Kale' village, which has a natural beauty | नैसर्गिक सौंदर्य लाभलेले ‘कोळे’ गाव

नैसर्गिक सौंदर्य लाभलेले ‘कोळे’ गाव

Next
ंगरकड्या कपार्‍याच्या पायथ्याशी वसलेले आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेले गाव म्हणून ‘कोळे’ गावाची ओळख सांगता येईल. पर्यटनाच्या दृष्टीने शासनस्तरावरुन पाठपुरावा झाल्यास कोळे गावाचा आमूलाग्र बदल होऊन वेगळी ओळख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास सरपंच अर्चना हातेकर यांनी व्यक्त केला.
मोठी महानगरे स्मार्ट होत असताना खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजेत त्याशिवाय खेड्यातून शहराकडे जाणारे लोंढे थांबणार नाहीत. कोळेसारख्या मोठय़ा लोकसंख्येच्या गावातील 60 टक्के लोक मुंबई, पुण्यासारख्या शहरात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास गेले आहेत. येथील शेती व्यवसाय पाण्याअभावी संकटात असलातरी त्यावरही मात करणारी जिगरबाज मंडळी इथे आहेत. या परिसराचा कायापालट होण्याच्या दृष्टीने भविष्यात टेंभू योजनेचे पाणी कायमस्वरुपी मिळणार आहे. असे झाले तर पर्यटनाच्या दृष्टीने जिल्?ाच्या नकाशावर हे गाव झळकल्याशिवाय राहणार नाही.
गाव खूप मोठे असलेतरी इथे अतिक्रमणाचा प्रश्न भेडसावतो आहे. राजकीय नेते व ग्रामस्थांच्याच पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागल्यास आदर्श स्मार्ट गाव म्हणून ओळख निर्माण होऊ शकते. पर्जन्यमान कमी असल्याने पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. आगामी काळात स्मार्ट ग्रामच्या माध्यमातून भरीव निधीची तरतूद झाल्यास गावाचा कायापालट होईल.

दृष्टिक्षेपात गाव..
4लोकसंख्या: 17000
4क्षेत्रफळ : 59 चौरस कि. मी.
4ग्रा. पं. सदस्य : 17
4कुटुंब संख्या : 1897
4दारिद्रय़ रेषेखालील: 417
4मागास कुटुंब: 600
4प्राथ. आरोग्य केंद्र: 1, पशुचिकित्सालय 1
4स्मशानभूमी 1
4 गावात , वाड्यावस्त्यांसह 28 प्राथमिक शाळा,महाविद्यालय- 2, अंगणवाड्या- 32, माध्यमिक विद्यालये 3
4 विकास संस्था- 3

विकासासाठी आवश्यक बाबी
4लोकसंख्येच्या तुलनेत व संवेदनशील ओळख असलेल्या कोळे गावात स्वतंत्र पोलीस ठाणे आवश्यक.
4मुख्य बाजारपेठेसह गावातील प्रमुख ठिकाणी व्यापारी गाळे बांधून विकास होणे गरजेचे. प्रवाशांच्या सोयीसाठी बसस्थानकाची गरज.
4गावात ठिकठिकाणी सार्व. शौचालयाची आवश्यकता.
4आबालवृद्धांसाठी बागबगिचा विकसित व्हायला हवा. तरुणांसाठी सुसज्ज व्यायामशाळा गरजेची.
गावची वैशिष्ट्ये..
4300 वर्षांची परंपरा जपलेला कोळेकर महाराज मठ संस्थान आहे. दर गुरुपौर्णिमा व अमावस्येला महाराष्ट्रासह कर्नाटकातून येणार्‍या भक्तगणांची संख्या मोठी असते.
4दरवर्षी महाशिवरात्रीला महादेवाची मोठी यात्रा भरते. यात्राकाळात शिवलिलामृत, ग्रंथवाचन व मिष्ठान्न भोजन आदी धार्मिक कार्यक्रम होतात.
4प्रथेप्रमाणे महालक्ष्मी देवी, वीर व यल्लम्मादेवीची यात्रा भरते. याशिवाय दत्त जयंती, हनुमान जयंती, रामनवमी, तुकाराम बीज अशा धार्मिक कार्यक्रमातून जागर केला जातो.
4वाड्यावस्त्यांवर नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणे आवश्यक

कोट:फोटो
गावात घरोघरी शौचालय बांधून गाव 100 टक्के हागणदारीमुक्त करुन निर्मलग्राम करण्याचा मानस आहे. गावाला स्वच्छ पिण्याच्या पाण्याबरोबर स्वच्छतेसाठी गटारी योजना राबवण्यावर भर असेल.
- अर्चना हातेकर, सरपंच

कोट/ फोटो
गावातील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण, गटारी व्यवस्थेबरोबर नागरिकांचे प्रबोधन करून गाव निर्मलग्राम करण्याचे सामूहिक प्रयत्न करणार आहोत.
- डी. बी. आडसूळ, ग्रामसेवक


कोळे
ग्रामदैवत: लक्ष्मीदेवी तीर्थक्षेत्र, महादेव मंदिर व कोळेकर महाराज मठ संस्थान
लोकसंख्या: 17000
पाण्याचे स्रोत: शिरभावी योजनेसह हातपंप व स्थानिक पाणीपुरवठा.

Web Title: The 'Kale' village, which has a natural beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.