कलहाने वाढवली अखिलेशची लोकप्रियता
By admin | Published: October 28, 2016 06:19 PM2016-10-28T18:19:49+5:302016-10-28T18:19:49+5:30
समाजवादी पार्टीच्या मतदारांमध्ये अखिलेश यादव यांची लोकप्रियता आणि स्वीकाहार्यता वाढल्याचे एका सर्वेतून निष्पन्न झाले आहे.
Next
> ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 28 - समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यांच्या परिवारात सुरू झालेला सत्तासंघर्ष अद्याप थांबलेला नाही. पण कौटुंबिक कलहातून अखिलेश यादव यांचे नेतृत्व अधिकच तावून सुलाखून निघत असल्याचे दिसत आहे. गेल्या महिनाभरामध्ये
या सर्वेत सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अखिलेश आणि शिवपाल यांच्या लोकप्रियतेबाबत प्रश्न विचारण्यात आला असता अखिलेश यांना शिवपाल यांच्यापेक्षा अधिक लोकप्रियता मिळत असल्याचे दिसून आले. सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेत जिथे 77.1 टक्के लोकांनी अखिलेश यांना पहिली पसंती दर्शवली होती. तिच संख्या ऑक्टोबरमध्ये वाढून 83.1 टक्के इतकी झाली.
तसेच मुख्यमंत्री म्हणून सप्टेंबरमध्ये अखिलेश यांना 66.5 टक्के लोकांनी पसंती दिली होती. तर ऑक्टोबरमध्ये 75.7 टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी अखिलेश यांच्या नावावर पसंतीची मोहोर उमटवली आहे. याउलट सपाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांना सप्टेंबर महिन्यात जिथे 19.1 टक्के लोक मुख्यमंत्री म्हणून पसंत करत होते. तीच संख्या घटून आता 14.9 टक्क्यांवर आली आहे. या सर्वेमध्ये उत्तर प्रदेशमधील 403 विधानसभा क्षेत्रातील 12 हजार 221 लोकांचे मत जाणून घेण्यात आले होते.