कळवण नगरपंचायतने केले स्वच्छता अभियान

By Admin | Published: October 5, 2016 12:31 AM2016-10-05T00:31:40+5:302016-10-05T01:24:03+5:30

Kalwan Nagar Panchayat organized cleanliness campaign | कळवण नगरपंचायतने केले स्वच्छता अभियान

कळवण नगरपंचायतने केले स्वच्छता अभियान

googlenewsNext


नगराध्यक्षसह नगरसेवक ,नगरसेविका , ग्रामस्थ सहभागी
कळवण -
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वच्छ व सुंदर स्वप्न वास्तवात आणण्यासाठी कळवण शहरातील प्रत्येक नागरीकाने वैयिक्तक व सार्वजनिक स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कळवण नगरपंचायतने 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून नगरपंचायत कार्यालय परिसरात व रामनगर परिसरात स्वच्छता मोहीम अभियान राबविले
कळवणच्या नगराध्यक्षा सौ सुनिता पगार, मुख्याधिकारी डॉ सचीन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतचे पदाधिकारीसह नगरसेवक, नगरसेविका , अधिकारी , कर्मचार्यांनी हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली .
प्रारंभी कळवण नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षा सौ सुनिता पगार यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्री यांच्या प्रतिमेचे पूजन करु न प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपस्थित मान्यवंरानी आदरांजली वाहिली. रामनगर येथे मुख्याधिकारी डॉ सचीन पटेल यांनी नगरपंचायतच्या वतीने उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.
कळवण शहरातील सर्व नागरिक ,संस्था ,संघटना ,शासकीय कार्यालये ,शाळा ,कार्यालये ,विद्यार्थी ,विद्यार्थिनी आणि नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या घराप्रमाणे परिसर स्वच्छ करून स्वच्छ व सुंदर कळवण संकल्पना यशस्वी करावी व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचे आवाहन कळवणच्या नगराध्यक्षा सौ सुनिता पगार यांनी यावेळी केले .
कळवणच्या नगराध्यक्षा सौ सुनिता पगार , उपनगराध्यक्षा सौ रंजना पगार,
मुख्याधिकारी डॉ सचीन पटेल ,बांधकाम सभापती जयेश पगार ,वैद्यकीय व आरोग्य सभापती अतुल पगार ,पाणीपुरवठा सभापती सौ अनिता जैन, महिला व बालकल्याण सभापती सौ रोहिणी महाले , नगरसेविका सौ रंजना जगताप, सौ भाग्यश्री पगार , नगरसेवक साहेबराव पगार, मयुर बहीरम, यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाला प्रारंभ झाला
यावेळी मुख्याधिकारी डॉ सचीन पटेल यांनी सांगितले की महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्ताने स्वच्छ भारत निर्माण अभियानाला सुरवात झाली असून या राष्ट्रीय कार्यात सर्व नागरिक ,संस्था ,संघटना यांनी सहभाग घेवून आपल्या घराप्रमाणे आपला परिसर आणि आपले शहर स्वच्छ करण्याची आपली जबाबदारी समजून स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे आणि स्वच्छ व सुंदर कळवण ही संकल्पना साकार करावी असे आवाहन केले .
यावेळी नगरसेवक बाळासाहेब जाधव नितीन पाटील, सुनील जैन , गौरव पगार, सुनील महाले , मुख्याधिकारी , संजय आहेर आदी उपस्थित होते. कळवण नगरपंचायत हद्दीत स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन जमा करण्यात आलेला कचरा घंटागाडीद्वारे उचलण्यात आला.

क्कद्धश“श ष्ड्ड›“द्बशठ्ठ-
कळवण नगरपंचायतने कळवण शहरात राबविलेल्या स्वच्छता अभियानाचा प्रारंभप्रसंगी कळवणच्या नगराध्यक्षा सौ सुनिता पगार , सौ रंजना पगार ,सौ अनिता जैन ,सौ भाग्यश्री पगार ,सौ रंजना जगताप ,अतुल पगार, साहेबराव पगार, ,बाळासाहेब जाधव , मयुर बहीरम, नितीन पाटील, सुनील जैन , गौरव पगार, सुनील महाले , मुख्याधिकारी डॉ सचीन पटेल, संजय आहेर आदी (04कळवण स्वच्छता)

Web Title: Kalwan Nagar Panchayat organized cleanliness campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.