उद्या दुपारी 12 वाजता अभिनेते कमल हासन करणार मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 06:48 PM2017-11-06T18:48:19+5:302017-11-06T18:53:57+5:30

कमल हासन यांनी हिंदू दहशतवादासंबंधी केलेल्या विधानावरुन ते सध्या भाजपाच्या निशाण्यावर आहेत.

Kamal Haasan will make a big announcement tomorrow at 12 noon | उद्या दुपारी 12 वाजता अभिनेते कमल हासन करणार मोठी घोषणा

उद्या दुपारी 12 वाजता अभिनेते कमल हासन करणार मोठी घोषणा

Next
ठळक मुद्देअभिनेता कमल हासन आणि त्यांच्यासारख्या लोकांची गोळ्या घालून हत्या केली पाहिजे. हिंदू धर्मासाठी अपमानास्पद भाषा वापरणा-यांना जगण्याचा कोणताच हक्क नाही.

चेन्नई - अभिनयाकडून राजकीय प्रवेशाच्या वाटेवर असललेले कमल हासन उद्या मंगळवारी दुपारी 12 वाजता मोठी घोषणा करणार आहेत. कमल हासन नेमका काय निर्णय जाहीर करणार याविषयी कमालीची उत्सुक्ता आहे. मागच्या काही दिवसांपासून कमल हासन सातत्याने राजकीय विधाने करत आहेत. त्यामुळे ते दुस-या कुठल्या पक्षात जाणार कि, स्वत:चा राजकीय पक्ष काढणार ते उद्याच स्पष्ट होईल. सीएनएन न्यूज 18 ने कमल हासन उद्या दुपारी घोषणा करणार असल्याचे वृत्त दिले आहे. 

कमल हासन यांनी हिंदू दहशतवादासंबंधी केलेल्या विधानावरुन ते सध्या भाजपाच्या निशाण्यावर आहेत. उजव्या विचारसरणीच्या लोकांनी भारतात हिंदू दहशतवादी असल्याचे नाकारु नये. उजव्या विचारसरणीच्या लोकांनी कोणालाही आव्हान देऊ नये. त्यांच्यामध्ये हिंदू दहशतवादी आहेत. हा दहशतवाद पसरला असून त्यांना त्याचा काहीही उपयोग होणार नाही असे  कमल हासन यांनी एका तामिळ साप्ताहिकात लिहिलेल्या लेखात म्हटले होते. त्यांचा हा लेख विधान भाजपा नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. 

कमल हासन यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली पाहिजे. त्यांची मनोवस्था ठीक नसून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्याची गरज आहे असे भाजपा नेते विनय कटियार म्हणाले. अशा प्रकारचे एखाद्याची बदनामी करणारे राजकारण करणे अजिबात योग्य नाही. त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाहीय असे कटियार यांनी सांगितले. 

कमल हासनला गोळ्या घातल्या पाहिजेत
अभिनेता कमल हासन आणि त्यांच्यासारख्या लोकांची गोळ्या घालून हत्या केली पाहिजे असं अखिल भारतीय हिंदू महासभेने म्हटलं होतं. 'कमल हासन आणि त्यांच्यासारख्यांना धडा शिकवण्यासाठी एकतर गोळ्या घालून हत्या केली पाहिजे, किंवा फासावर लटकवलं पाहिजे. हिंदू धर्मासाठी अपमानास्पद भाषा वापरणा-यांना जगण्याचा कोणताच हक्क नाही. असं अपमान कोणी करत असेल तर त्याला जगण्याचा अधिकार नाही', असं अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक शर्मा बोलले. 

हिंदू महासभेच्या दुस-या एका नेत्याने कमल हासन यांच्या सर्व चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. 'आमच्या सर्व सदस्यांनी कमल हासन आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित सर्व चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची शपथ घेतली आहे. सर्व भारतीयांनीही हा निर्णय घेतला पाहिजे. हिंदूंचा आणि धर्माचा अपमान करणा-यांना माफ करता कामा नये', असं मेरठचे अध्यक्ष अभिषेक अग्रवाल बोलले. 

Web Title: Kamal Haasan will make a big announcement tomorrow at 12 noon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.